Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Salman Khan च्या घराबाहेर गोळीबार; बिश्नोई गँगशी संबंध असल्याची शक्यता

रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Bollywood Star Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आलेली आहे.

रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Bollywood Star Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आलेली आहे. (Firing at Salman khan’s Apartment) पहाटे ५ वाजता सलमान खानचे निवासस्थान गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर हि घटना घडली.

सलमान खान वांद्रे (Bandra) येथे गॅलॅक्सि अपार्टमेंट (Galaxy Apartment) मध्ये राहतो. त्याच्या घरावर झालेला गोळीबार हा २ अज्ञातांकडून करण्यात आल्याचे समोर आले. हे दोघे जण पहाटे ५ च्या सुमारास दुचाकीवरून येत त्यांनी अपार्टमेंट बाहेर गोळीबार केला. अज्ञातांनी गोळीबार ४ राऊंड मध्ये केला.यातील १ गोळी गॅलरीच्या पडद्यामधून आत गेल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम घटनास्थळी दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. महत्वाचे सीसीटीव्ही आणि डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अज्ञातांचा अद्याप शोध चालू आहे.

याआधी २०२२ मध्ये सलमान खानचे वडील जॉगिंग करत असताना त्यांना एका चिट्टीद्वारे धमकी देण्यात आली होती. या चिट्ठीत ‘मुसेवाला जैसे कर देंगे’ (Siddhu Moosewala) अस लिहलं होते. या घटनेनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवून त्याला पिस्तुलीचे लायसेन्स देखील देण्यात आले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये देखील एक धमकीचा ईमेल सलमानला आला होता परंतु नुकत्याच झालेल्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास चालू आहे. यापूर्वी सलमान खानला बिश्नोई गॅंगकडून धमकी देण्यात आल्या होत्या. आज झालेल्या गोळीबारामध्येही बिश्नोई गँगचा (Bishnoi Gang) संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss