Monday, April 29, 2024

Latest Posts

महामानव Dr. Babasaheb Ambedkar यांच्या जयंतीचा उत्सव 

भारताचे संविधानकर्ते दलितांना न्याय मिळून देणारे समाजसुधारक, पत्रकार, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, वकील आणि बौद्ध धर्माचे तारणहार म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८११ रोजी झाला. बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह, संविधानाची निर्मिती, मंदिर सत्याग्रह, दलित समाजाला हक्क मिळवून देणे, पुणे करार, गोलमेज परिषद,बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, स्वतंत्र लढ्यात सहभाग, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना अशा अनेक कार्यांसाठी आपले जीवन वाहिले. शिका आणि संघटित व्हा असा संदेश ते नेहमीच देत राहिले. बाबासाहेबांनी शिक्षणाला विशेष महत्व दिले. आणि फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी ते लढले.

मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेबांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव रमाबाई असे होते. दापोली, सातारा या ठिकाणी मध्य प्रदेशानंतर वास्तव्य करून बाबासाहेब व त्यांचे कुटुंब मुंबईस आले. बाबासाहेबांनी सुरवातीचे शिक्षण पूर्ण केले पण पुढील शिक्षण पूर्ण करण्यात त्यांना बऱ्याच यातना भोगाव्या लागल्या. बाबासाहेब दिवसातील १८ तास अभ्यास करायचे. त्यांचा विवाह रामबाईशी १४ ते १५ वर्षाचे असताना झाला. मुंबई विद्यापीठातून बी.ए. ची डिग्री घेऊन बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. ची डिग्री प्राप्त केली. ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेऊन ३ एप्रिल १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला.

१९२० मध्ये बाबासाहेबांनी मूकनायक नावाचे वृत्तपत्र चालू केले. दलित लोकांना पाणी पिण्याचा अधिकार संपूर्ण महाराष्ट्रात नव्हता. अस्पृश्यांना हा हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. नंतर बाबासाहेबांनी शेती राष्ट्रीयकरण करण्याची संकल्पना मांडली. पीक पद्धती उत्पादन वाढ व्हावी हे त्यांचे म्हणणे होते. बाबासाहेब दलितांचे आणि अस्पृश्याचे प्रतिनिधी बनून लंडनच्या तिन्ही गोलमेज परिषदेसाठी उपस्थित राहिले. मजुरांना व कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानात सिंहाचा वाटा होता.

हिंदू धर्मात आपल्याला समानतेची वागणूक मिळवण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला परंतु, शेवटी त्यांनी धर्मत्यागाचा निर्णय घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला. मार्च १५५९ च्या अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचे दिसून येते. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात समाजकार्य साठी मोठा लढा दिला ते नेहमी इतरांसाठी लढत राहिले. ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते. अखेरीस ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीला निवास स्थानी बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचे विचार अजूनही लोकांमध्ये जिवंत आहेत.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss