Saturday, May 18, 2024

Latest Posts

गुगलचे हमिदा बानोंसाठी अनोखे डुडल

गुगल नेहमीच आपल्या वेगवेगळ्या डुडलने प्रेक्षकांना आकर्षित करत असते. काही विशेष दिनांना आपल्याला गुगलचे डुडल पहायला मिळते. आज ४ मे रोजी गुगलने हमिदा बानोंसाठी डुडल अर्पण केले आहे. हमिदा बानो भारताच्या पहिल्या महिला पहिलवान होत्या. ४ मे १९४५ रोजी केवळ १ मिनटं ३४ सेकंदामध्ये हमिदाने जिंकून दाखवले होते. या नंतर हमिदा यांना आंतराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले. त्यांनी सर्वात सुप्रसिद्ध बाबा पहिलवान यांना हरवले होते. हामिदांकडून हरल्यानंतर बाबा पहिलवानांनी कुस्तीतून संन्यास घेतला.

गुगलने डिस्क्रिप्शन मध्ये “हमिदा त्या वेळची अग्रेसर कुस्तीपटू होती. हमिदाला तिच्या निडरतेमुळे संपूर्ण जगभरात ओळखतात. आपल्या खेळा व्यतिरिक्त हमिदा नेहमी स्वतःप्रती प्रामाणिक असायच्या” गुगल चे आजचे हे डुडल बंगळुरूच्या  कलाकार दिव्या नेगी यांनी बनवले आहे. या डुडल मध्ये मागे त्यांनी विविध वनस्पती देखील दर्शवल्या आहेत. हमिदा यांना ‘अलिगढ ची अमेझन’ म्हणून ओळखलं जायचं. हमिदा यांचा जन्म १९०० च्या सुरवातीस झाला होता. उत्तरप्रदेशमधील एका पहिलवान कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच कुस्ती बद्दल त्यांना प्रेम होते. त्यांनी लहान पण पासूनच कुस्तीचा अभ्यास सुरु केला. १९४० आणि १९५० च्या दशकात त्यांनी ३०० पेक्षा अधिक कुस्तीच्या स्पर्धा जिंकल्या.

हमिदांची लग्नासाठीची अनोखी अट

हमिदा बानो यांनी १९४० ते १९५० च्या दशकात आव्हान देत असे म्हंटले होते कि जर कुणी मला कुस्तीमध्ये हरवले तर मी त्याच्याशी लग्न करेल. हे आव्हान स्वीकारत १९३७ मध्ये फिरोज खान यांनी हमिदा सोबत कुस्ती ची स्पर्धा केली पण या स्पर्धेत हमिदाने फिरोजना चित केले. याशिवाय दुसरा पहिलवान खडंग सिंह यांना सुद्धा तिने पराभूत केले होते.

हे ही वाचा:

माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत, यांच्यासारखा चिंधीचोर नाही, Kalyan Kale यांची Raosaheb Danve यांच्यावर टीका

नारायण राणे यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा Raj Thackeray | Narayan Rane

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss