spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा कसा झाला अंडरवर्ल्ड डॉन…

दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा भारताचा सर्वात मोठा दुश्मन आहे.

दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा भारताचा सर्वात मोठा दुश्मन आहे. त्यातच आता दाऊदवर विष प्रयोग केल्याची चर्चा जगभरात सगळीकडे आहे. त्याची प्रकृती खालवल्याची माहिती मिळाली आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला करणारा, बॉम्बस्फोट घडवून निरापराध लोकांचे प्राण घेणारा दाऊद इब्राहिम नेमका कोण आहे? दाऊदचा जन्म कुठे झाला? एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा अंडरवर्ल्ड डॉन कसा झाला? त्याची लाईफस्टोरी काय आहे? त्याची लाईफस्टाईल कशी आहे? विष प्रयोगानंतर तो नेमका कसा आहे?

दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरीत १९५५ साली झाला. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस कॉन्स्टेबल होते. नंतर कासकर कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झाले. ७० च्या दशकात अंडरवर्ल्डच्या जगात दाऊदचे नाव मोठे होऊ लागले. दाऊदचा भाऊ साबीर इब्राहिम कासकर याची १९८१ साली हत्या झाली. त्यानंतर दाऊदच्या मनात जो राग निर्माण झाला त्यातूनच दाऊद मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन बनला. दाऊद आधी हाजी मस्तानच्या गँगमध्ये काम करत होता. तिथे त्याचा प्रभाव वाढू लागला. नंतर त्याच्या गँगला डी-कंपनी नावाने संबोधले जाऊ लागले.

दाऊद डी-कंपनीचा म्होरक्या होता. ९० च्या दशकात तर त्याची मुंबईत जबरदस्त दहशत होती. साल होते, १९९३ चे दिवस होता १२ मार्चचा अन् स्थळ होतं देशाची आर्थिक राजधानी मुंबई एकाच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. ११ ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्फोटमध्ये 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनेमागे एका डॉनचे नाव होते. तो डॉन म्हणजे दाऊद इब्राहिम दाऊद इब्राहिम हा मोस्ट वॉंडेट अंडरवर्ल्ड डॉन आहे. त्याची १५ टोपणनावं आहेत. दाऊद इब्राहिम, शेख दाऊद हसन, अब्दुल हामिद अब्दुल अजीज, अनीस इब्राहिम, अजीज दिलीप, दाऊद हसन शेख इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेमन कासकर, दाऊद हसन इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेमन, दाऊद साबरी, कासकर दाऊद हसन, शेख मोहम्मद इस्माइल अब्दुल रहमान, दाऊद हसन शेख इब्राहिम, शेख इस्माइल अब्दुल आणि हिजरत ही दाऊदची टोपणनावं आहेत.

हे ही वाचा:

IPL 2024 Auction, उद्या होणार आयपीएल लिलाव…, प्रत्येक संघाकडे किती पैसे आहेत घ्या जाणून

मुंबईतील जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss