Saturday, July 27, 2024

Latest Posts

IPL 2024 Auction, उद्या होणार आयपीएल लिलाव…, प्रत्येक संघाकडे किती पैसे आहेत घ्या जाणून

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मिनी लिलावासाठी क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. उद्या दिनांक १९ डिसेंबर रोजी हा लिलाव दुबईत होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मिनी लिलावासाठी क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. उद्या दिनांक १९ डिसेंबर रोजी हा लिलाव दुबईत होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात होणार आहे. या लिलावात एकूण ३३३ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने या खेळाडूंची यादी आधीच जाहीर केली होती. यावेळी हा मिनी लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. लिलावासाठी निवडलेल्या ३३३ खेळाडूंपैकी २१४ भारतीय आहेत. तर ११९ परदेशी खेळाडू आहेत. तसेच, या यादीत १११ कॅप्ड आणि २१५ अनकॅप्ड खेळाडू आहेत. तर या यादीत २३ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी आहे

या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की IPL 2024 साठी सर्व १० संघांमध्ये एकूण ७७ खेळाडू आहेत. याचा अर्थ ३३३ निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ ७७ खेळाडूंना विकता येणार आहे. ३३३ खेळाडूंच्या यादीत २३ खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. तर १३ खेळाडूंची मूळ किंमत १.५ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय १ कोटी, ५० लाख, ७५ लाख, ४० लाख, ३० लाख आणि २० लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.

आता गुजरात टायटन्सच्या पर्समध्ये सर्वाधिक ३८.१५ कोटी रुपये शिल्लक आहेत. म्हणजेच हा संघ लिलावात सर्वाधिक पैसा खर्च करू शकतो. तर आता त्याला फक्त 8 खेळाडू खरेदी करायचे आहेत. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) च्या पर्समध्ये सर्वात कमी १३.१५ कोटी रुपये शिल्लक आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाला आता आणखी ६ खेळाडू खरेदी करायचे आहेत.

संघ                            सध्याचे खेळाडू       पर्समध्ये राहिलेले पैसे     तुम्ही किती खेळाडू खरेदी करू शकता?

गुजरात टायटन्स (GT)                17                   38.15 कोटी                              8
सनरायझर्स हैदराबाद (SRH)         19                   34 कोटी                                  6
कोलकाता नाइट रायडर्स (KKR)      13                  32.7 कोटी                              12
चेन्नई सुपर किंग्स (CSK)              19                  31.4 कोटी                                6
पंजाब किंग्स (PBKS)                  17                 29.1 कोटी                                8
दिल्ली कॅपिटल्स (DC)                 16                  28.95 कोटी                              9
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)         19                  23.25 कोटी                              6
मुंबई इंडियन्स (MI)                    17                  17.75 कोटी                              8
राजस्थान रॉयल्स (RR)                  17                 14.5 कोटी                                8
लखनौ सुपर जायंट्स (LSG)            19                 13.15 कोटी                              6

हे ही वाचा:

 “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट

दरवर्षी का होतो कांद्याचा वांदा? निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना किती बसतो फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss