Wednesday, February 28, 2024

Latest Posts

२०२३ या वर्षात गुगलवर ‘हे’ पदार्थ सर्वाधिक झाले सर्च; जाणून घ्या सविस्तर माहिती

०२३ हे वर्ष संपून आता २०२४ या वर्षाला लवकरच सुरुवात होणार आहे.

२०२३ हे वर्ष संपून आता २०२४ या वर्षाला लवकरच सुरुवात होणार आहे. २०२३ हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन सगळेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. यावर्षी गुगलवर सर्वात जास्त हेल्दी पदार्थांना सर्च करण्यात आले आहे. यावरून असे दिसून येते कि अनेकांनी काही हेल्दी पदार्थ सर्च केले आहेत. लोकांना चविष्ट आणि हेल्दी पदार्थ खायला आवडतात. भारताची निरोगी जीवशैलीकडे वाटचाल चालू आहे असे दिसून आहे आहे. तसेच आता गुगलने २०२३ मध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे. यावरून लोकांनी चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी घेतली आहे. या वर्षी कोणते पदार्थ अधिक शोधले गेले होते हे जाणून घेऊयात.

बाजरी (Pearl Millet)

२०२३ मध्ये लोकांनी बाजरी अधिक प्रमाणात समजून घेतली आहे. गुगलवर सर्वाधिक बाजरी शोधण्यात आली. बाजरीमध्ये बार्ली, बाजरी, कोदरा, नाचणी आणि कुटकी यांसारखे धान्य असतात. हे आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. लोकांनी बाजरीपासून बनवलेल्या अनेक पाककृती शोधल्या आहेत. बाजरी केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या आहारात बाजरीचा समावेश केला आहे.

एवोकॅडो (Avocado)

Avocado हा गुगलवर सार्वधिक शोधला जाणारा पदार्थ आहे. एवोकॅडो अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी असते. एवोकॅडोमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी फॅट असतात. यामध्ये फायबर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. या सर्व गुणांमुळे लोकांनी एवोकॅडोला गुगलवर सर्वाधिक सर्च केले आहे.

मटण रोगन जोश

गुगलवर शोधल्या जाणाऱ्या तिसऱ्या पदार्थामध्ये मटण रोगन जोश आहे. मटण रोगन जोश हा एक प्रसिद्ध काश्मिरी पदार्थ आहे. यामध्ये मटण मसालेदार ग्रेव्हीबरोबर शिजवले जाते. हा पदार्थ तुम्ही भात किंवा नान बरोबर देखील खाल जातो. हा पदार्थ चवीला छान आहे. म्हणूनच 2023 मध्ये गुगलवर तो खूप वेळा शोधला गेला. कारण हा पदार्थ खूप फायदेशीर आणि चवदार आहे.

काठी रोल्स (Kathi Rolls)

काठी रोल हा पदार्थ गुगलवर शोधण्यात आलेला चौथ्या क्रमांकाचा पदार्थ आहे. लोकांना हा पदार्थ नाश्ता म्हणून खूप आवडतो. यांच्यामध्ये भाज्या, चिकन किंवा चीज इत्यादींचे पिसेस पिठापासून बनवलेल्या पातळ ब्रेडमध्ये टाकले जातात आणि त्याचा रोल केला जातो. त्यानंतर वरून चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह केले जाते. हा अतिशय चविष्ट नाश्ता आहे. लोकांना ते बनवण्याची कृती आणि हे रोल्स कुठे मिळतात हे जाणून घेण्यात फार उत्सुकता होती.

हे ही वाचा:

भारतीय क्रिकेटसाठी 2023 हे वर्ष किती सुखकर होते? जाणून घ्या ५ चांगल्या आठवणी

संजय राऊत यांना उत्तर देता देता प्रसाद लाड यांचं जशाच तसं उत्तर प्रसाद लाड यांची जीभ घसरली, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss