Friday, April 26, 2024

Latest Posts

Imran Khan यांच्या घरात दहशतवादी लपल्याची माहिती

नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या डोक्याचे टेन्शन काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या डोक्याचे टेन्शन काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पाकिस्तान स्थित पंजाब सरकारचे म्हणणे आहे की, इम्रानच्या जमान पार्कच्या घरात ३० ते ४० दहशतवादी लपले आहेत. दरम्यान, पंजाबच्या अंतरिम सरकारने पीटीआयला लाहोरमधील माजी पंतप्रधानांच्या जमान पार्क निवासस्थानी आश्रय घेतलेल्या ३०-४० दहशतवाद्यांना पोलिसांच्या हवाली करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे.

लाहोरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना कार्यवाहक माहिती मंत्री आमिर मीर म्हणाले, “पीटीआयने या दहशतवाद्यांना पोलिसांच्या स्वाधीन करावे अन्यथा कायदा आपला मार्ग स्वीकारेल.” विश्वसनीय गुप्तचर अहवाल असल्याने सरकारला या ‘दहशतवाद्यां’च्या उपस्थितीची माहिती होती, असेही ते म्हणाले. पुढे मीर म्हणाले, ‘जे इंटेलिजन्स रिपोर्ट आला आहे तो अतिशय धोकादायक आहे.’ ते म्हणाले की, एजन्सींना भू-फेन्सिंगच्या माध्यमातून जमान पार्कमध्ये ‘दहशतवाद्यां’च्या उपस्थितीची पुष्टी करण्यात यश आले आहे. मीर म्हणाले, पीटीआय प्रमुख वर्षभरापासून लष्करावर निशाणा साधत आहेत. याशिवाय ‘दहशतवाद्यांना’ पोलिसांच्या स्वाधीन करावे, अशा कडक शब्दात मेरे यांनी पीटीआयला सुनावले आहे.

पीटीआयचे वरिष्ठ नेते आणि पंजाबचे माजी मंत्री डॉ. यास्मिन रशीद आणि मियां महमुदूर रशीद यांना पाकिस्तानच्या पंजाब सरकारने ९ मे रोजी जिना हाऊस हल्ल्यासाठी जबाबदार धरले आहे. पीटीआयचे नेते इबाद फारूख यांनी त्यांच्या व्हिडिओ वक्तव्यात मोठा खुलासा केला आहे. ते म्हणतात की पीटीआय नेते यास्मिन रशीद, मियां महमुदूर रशीद आणि इतरांनी अनेक पक्ष कार्यकर्त्यांना लिबर्टी चौकात जाण्यासाठी बोलावले.

पीटीआयच्या नेत्यांनीही आंदोलकांना जिना हाऊस पेटवण्यास सांगितले, असा आरोप इबाद यांनी केला. जिना हाऊसमध्ये जे काही झाले ते योग्य नव्हते. याशिवाय इबाद फारुख यांनी पीपी-१४९ (निवडणूक जागा) वरून पीटीआयचे तिकीट परत करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (NSC) महत्त्वपूर्ण बैठक झाली. मंगळवारी झालेल्या या बैठकीत हिंसक हल्ल्यात सामील असलेल्या सर्व लोकांना त्यांच्या मदतनीस आणि नेत्यांवर ७२ तासांत कारवाई करण्याचे सांगण्यात आले, ज्यांच्या प्रेरणेवर या लोकांनी तोडफोड केली.

एनएससीच्या मंगळवारच्या बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयाने अधिकृत घोषणेमध्ये म्हटले आहे की, लष्करी कायदा आणि अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत हल्लेखोरांवर खटला चालवण्याच्या कॉर्प्स कमांडर्सच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाला एनएससीने समर्थन दिले आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss