Saturday, July 27, 2024

Latest Posts

LPG सिलेंडरच्या दरात घसरण, ‘या’ ग्राहकांना मिळणार ४० रुपयांची सूट

LPG सिलेंडर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

LPG सिलेंडर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये (LPG Cylinder Prices) कपात केली आहे. आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ग्राहकांना प्रत्येक सिलेंडरवर ४० रुपये सूट मिळणार आहे. तर एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणतीही बदल करण्यात आले नाही.

मागील काही महिन्यापासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत होती. तसेच गेल्या तीन महिन्यात या किंमत तीनदा वाढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली होती. गेल्या वेळी डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये २१ रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर त्याच्याआधी नोव्हेंबर महिन्यात १०१ रुपयांनी वाढला होता. ऑक्टोबर महिन्यात देखील २०९ रुपयांनी एलपीजी सिलेंडरची किंमत वाढली होती. सरकारी तेल विपणन कंपनी OMC ने एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये ३९.५० रुपयांनी कमी केली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन किमती आजपासून (२२ डिसेंबर) लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून सर्व प्रमुख शहरातील एलपीजी सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत. आज किंमती बदलामुळे मुंबईमध्ये सर्वात स्वस्त दरात गॅस मिळणार आहे. तसेच चार महानगरांमध्ये सिलेंडरच्या किमतींमध्ये घट झाली आहे तर काही ठिकाणी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १,७१० रुपये असणार आहे तर चेन्नईमध्ये १,९२९ रुपये झाली आहे. दिल्लीमध्ये १,७५७ रुपये किंमत झाली आहे.

राज्यात एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्याने बदल होत आहेत. सातत्याने होणाऱ्या बदलांचा फटका सर्वसामान्य जनेतला बसला आहे. तेल कंपनीने १४ किलो गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणतेही बदल केले नाही. दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल झाले आहेत. आजपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सिलेंडरचे भाव बदलले आहेत.

हे ही वाचा:

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

बुलढाण्यातील शेतकऱ्याच्या घरात सापडला ४० किलो गांजा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss