Monday, May 20, 2024

Latest Posts

केंद्र सरकारचे शेतकऱ्यांसाठी नवीन चार उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी सणासुदीच्या वेळी नवीन उपक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी सणासुदीच्या वेळी नवीन उपक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे. काही जुन्या योजना नव्याने पुन्हा राबवण्यात येणार आहेत. त्यांचा हा नवीन उपक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. देशातील लाखो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने हे नवीन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे. चला तर पाहुयात केंद्र सरकारच्या नवीन चार योजना

केंद्र सरकारनं गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारी नवी दिल्लीत दोन नवीन पोर्टल सुरु केले आहेत. त्यातील एक म्हणजे किसान ऋण पोर्टल.सरकार यामध्ये कमी दरात शेतकऱ्यांना कर्ज देणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. यामध्ये सगळ्यात आधी शेतकऱ्यांना सवलत व्याज दरात कर्ज भेटणार आहे. आणि वेळेवर कर्ज भरल्यास अधिक अनुदान मिळणार आहे. हे पोर्टल शेतकऱ्यांशी संबंधित डेटा तपशीलवार पाहण्यासाठी एक व्यासपीठ असेल, जिथे कर्ज वितरण, व्याज सवलतीचे दावे, योजनांचा उपयोग, बँकांशी एकीकरण यासारखी कामे पूर्ण केली जातील.

KCC उपक्रम
३ लाखांपर्यंतच कर्ज देण्यासाठी सरकार KCC उपक्रम राबवणार आहे. हा उपक्रमाबद्दल माहिती देताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड कर्जावर सरकार सुमारे २० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

घर-घर केवाईसी
घर घर केवाईसी याचा लाभ अधिक अधिक शेतकऱ्यांना मिळावा सरकारने केवाईसीच्या घरोघरी मोहिमेची माहिती दिली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना किसान क्रेडिट कार्डशी जोडण्यासाठी मोहीम राबवणार असल्याचे सांगण्यात आले. याअंतर्गत जे शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी आहेत, ज्या शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी सहा-सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे, अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

WINDS पोर्टल
भारतामधील शेती ही हवामानावर अवलंबून आहे. यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. किसान लोन पोर्टलसोबतच सरकारने WINDS पोर्टल सुरु केले आहे. . या पोर्टलचे पूर्ण नाव आहे Weather Information Network Data Systems असे आहे. या पोर्टल मधून देशभरातील शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित हवामानाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळणार आहे. ज्याची सुरुवात जुलैमध्ये होणार आहे. हे पोर्टल शेतकऱ्यांना हवामानाशी संबंधित डेटासाठी विश्लेषण साधने प्रदान करेल, जेणेकरून ते शेतीसंबंधी माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील.

किसान क्रेडिट कार्ड खात्यांची संख्या सुमारे ७. ३५ कोटी
भारतातील किसान क्रेडिट कार्ड खात्यांची संख्या सुमारे ७. ३५ कोटी आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत शेतकऱ्यांना अनुदानित व्याजावर ६. ५७३.५० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. पीएम पीक विमा योजनेअंतर्गत, २९ हजार कोटी रुपयांच्या प्रीमियमच्या तुलनेत सुमारे १.४१ लाख कोटी रुपये वितरित केले गेले आहेत.

हे ही वाचा: 

पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रोड मॅपची सुविधा

गणपती बाप्पाचे विसर्जन का केले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss