Tuesday, April 23, 2024

Latest Posts

Anjali Damania यांच्या दाव्यावर Chhagan Bhujbal म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) हे भाजपच्या वाटेवर आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा आणि राज्य सभा या निवडणुकांची. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. तर काहींनी पक्षाची साथ सोडत नवीन पक्षात एन्ट्री देखील केली आहे. परंतु आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. भाजप पक्षामध्ये एक मोठा चेहरा एन्ट्री करणार असल्याच्या बातम्या सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) हे भाजपच्या वाटेवर आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Social activist Anjali Damania) यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का? असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला. त्यांच्या या ट्विटला आता खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनीच उत्तर दिलं आहे. भाजपकडून कसलीही ऑफर आलेली नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

अंजली दमानिया यांचं ट्विट काय?

भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप?, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं. त्यांच्या या ट्विटनंतर चर्चांना उधाण आलं. आता भुजबळ यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले –

मला अजून भाजपच्या ऑफरबद्दल काही माहिती नाही. दमानियांना कशी काय माहिती मिळाली? हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाचा हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे, असं काही नाही. असं काही प्रपोजल मला आलेलं नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी काही घुसमट होत नाहीये, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss