Odisha Train Accident वर PM मोदींनी बोलावली बैठक बोलावली

शुक्रवार दिनांक २ जून रोजी ओडिशातील (Odisha) बालासोर येथे संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला.

Odisha Train Accident वर PM मोदींनी बोलावली बैठक बोलावली

शुक्रवार दिनांक २ जून रोजी ओडिशातील (Odisha) बालासोर येथे संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडा हा २८८ परी गेला असून ९०० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काल रात्रीपासून मोठ्या शर्तीने बचावकार्य हे सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अँक्शन मोडमध्ये आले आहेत.

जे बचावकार्य सुरु आहे आणि आतापर्यंतच्या बचाव कार्याची माहिती घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली आहे. तसेच एनडीआरएफ, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, राज्य आपत्ती निवारण दल, आर्मी मेडिकल कॉर्प्स अपघातस्थळी बचाव आणि मदत कार्य करत आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शनिवारी (३ जून) सकाळी घटनास्थळी भेट दिली, तसेच रेल्वेमंत्र्यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत.

डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, एनडीआरएफच्या ९ टीम अपघातस्थळी तैनात आहेत. घटनेनंतर पाऊण तासात आमची पहिली टीम तिथे पोहोचली होती. ३०० हून अधिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत आणि आम्ही आज संध्याकाळपर्यंत तेथे ऑपरेशन पूर्ण करू शकतो. बालासोर ट्रेन दुर्घटनेतील जखमींना मदत करण्यासाठी रक्तदान करणारे लोक रक्तदान करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचत आहेत. रक्तदान करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, “लोकांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे, अनेक लोक आहेत ज्यांना पाय आणि हात नाहीत. मी रक्तदान केले जेणेकरून कोणाचा तरी जीव वाचू शकेल आणि ते त्यांच्या घरी जातील.”

एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, जखमींना रुग्णालयात दाखल करणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. हा अपघात मानवी चुकांमुळे झाला की तांत्रिक कारणास्तव याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आज रात्रीपासून पश्चिम मार्गावर तब्ब्ल १४ तासांचा Special Block, उद्या घराबाहेर जाणार असाल तर वेळापत्रक घ्या जाणून

Odisha Train Accident संदर्भात हेल्पलाइन नंबर जारी, जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version