Saturday, July 27, 2024

Latest Posts

नवीनवर्षात पोस्टऑफिसची धमाकेदार योजना लॉन्च , काय आहे पहाचं

तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही किसान विकास पत्र योजनेचा उत्तम पर्याय निवडू शकता. या योजनेवर सरकार ७ टक्क्यांहून अधिक व्याज देणार आहे.

तुमच्या जवळच्या पोस्टऑफिसला काही ना काही स्किम , गुंतवनुक राबवल्या जात असतात . त्यातीलच एका गुंतवनूकीची काय ? फायदेशीर योजना आहे त्या आपण पाहुयात पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना (Investment Scheme) लोकप्रिय आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांना भरघोस परताना मिळतो. यातच किसान विकास पत्र योजनेचा समावेश होतो. या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याची हमी दिली जाते. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही किसान विकास पत्र योजनेचा उत्तम पर्याय निवडू शकता. या योजनेवर सरकार ७ टक्क्यांहून अधिक व्याज देणार आहे.

सुरक्षित गुंतवणुकीसह उत्तम परतावा हे या योजनेचं महत्वाचं आहे.
प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवून सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याची इच्छा असते. गुंतवणूक सुरक्षित असावी आणि त्यातून चांगला परतावा मिळावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांकडे गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजना अंतर्गत सरकार ७. ५ टक्के व्याज देत आहे. तुम्ही या योजनेत १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकणार आहेत.

तुम्ही १००० रुपयांची गुंतवणूक करू शकता
किसान विकास पत्र योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता आणि फायदा मिळवू शकता. १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केल्यानंतर तुम्हीरुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही संयुक्त खाते उघडूनही गुंतवणूक करू शकता. यासोबतच किसान विकास पत्रामध्ये नॉमिनीची सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये १० वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलेदेखील त्यांच्या स्वतःच्या नावाने KVP खाते उघडू शकतात.

११५ महिन्यांत पैसे दुप्पट तुमि करू शकणार कस त्या जाणून घ्या
या योजनेत किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुमचे पैसे दुप्पट करण्याचं समीकरण कसं आहे जाणून घ्या. यासाठी तुम्हाला ९ वर्षे आणि ७ महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच, जर तुम्ही किसान विकास पत्र योजनेत ११५ महिन्यांसाठी १ लाख रुपये गुंतवले तर या कालावधीत ही रक्कम २ लाख रुपये होईल. जर तुम्ही यामध्ये ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला १० लाख रुपये मिळतील. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेल्या रकमेवर व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते, म्हणजे तुम्हाला व्याजावरही व्याज मिळणार आहे.

या अगोदर ही योजना कस काम करायची
यापूर्वी, या योजनेअंतर्गत, पैसे दुप्पट होण्यासाठी १२३ महिने लागायचे, आता सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी २०२३ मध्ये याचा कालावधी कमी करून १२० महिने केला आणि काही महिन्यांनंतर, अधिक लाभ देण्यासाठी सरकारने हा कालावधी ११५ महिने केला आहे.

प्रश्न पडला असलं ना कि KVP खाते कसे उघडावे? तर मग जाणून घ्या
किसान विकास पत्र योजनेसाठी खाते उघडणे खूप सोपे आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करावी लागेल. अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्रही जोडावे लागेल. किसान विकास पत्र ही एक छोटी बचत योजना आहे. दर तीन महिन्यांनी सरकार आपल्या व्याजदराचा आढावा घेते आणि आवश्यकतेनुसार बदल करते. तर मग वाट कसली पाहताय लवकरात लवकर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून हे काम घ्या. 

हे ही वाचा:

THANE: आता एसटी महामंडळाचे तिकीट DIGITAL स्वरुपात, सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार

देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, खासदार संजय राऊतांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss