Rajouri येथे दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान ५ जवान शहीद, Rajnath Singh यांनी वाहिली श्रद्धांजली

जम्मू-काश्मीरच्या राजौरी (Rajouri) जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत स्फोटात शहीद झालेल्या पाच लष्करी जवानांना भारतीय लष्कराने आज दिनांक ६ मी रोजी शनिवारी श्रद्धांजली वाहिली आहे.

Rajouri येथे दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान ५ जवान शहीद, Rajnath Singh यांनी वाहिली श्रद्धांजली

जम्मू-काश्मीरच्या राजौरी (Rajouri) जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत स्फोटात शहीद झालेल्या पाच लष्करी जवानांना भारतीय लष्कराने आज दिनांक ६ मी रोजी शनिवारी श्रद्धांजली वाहिली आहे. दिनांक ५ मे रोजी राजौरी ऑपरेशन दरम्यान हा हल्ला झाला. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शनिवारी (६ मे) जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पोहोचले. संरक्षण मंत्री वरिष्ठ लष्करी कमांडर आणि संरक्षण अधिकाऱ्यांकडून राजौरी भागात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती घेतली आहे. यासोबतच ते शहीद जवानांनाही श्रद्धांजली वाहिली.

देशासाठी बलिदान देणाऱ्या हवलदार नीलम सिंग, एनके अरविंद कुमार, एल/एनके आरएस रावत, पीटीआर प्रमोद नेगी आणि पीटीआर एस छेत्री यांच्या सर्वोच्च बलिदानाला भारतीय लष्कराच्या सर्व श्रेणी सलाम करतात. आम्ही शोकग्रस्त कुटुंबांसोबत एकजुटीने उभे आहोत,” असे भारतीय लष्कराने ट्विटमध्ये म्हटले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांच्यासोबत भारतीय लष्कराच्या दहशतवादविरोधी ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ दरम्यान हे पाच जवान शहीद झाले. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही प्राण गमावलेल्या पाच लष्करी जवानांना श्रद्धांजली वाहिली होती. लान्स नाईक रुचिन सिंग रावत, पॅराट्रूपर सिद्धांत छेत्री, नाईक अरविंद कुमार, हवालदार नीलम सिंग आणि पॅराट्रूपर प्रमोद नेगी हे शहीद जवान आहेत.

 

सुमारे पंधरवड्यापूर्वी जम्मू प्रदेशातील भाटा धुरियनच्या तोटा गली भागात लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कर ऑपरेशन करत होते, ज्यामध्ये आणखी पाच जवानांना प्राण गमवावे लागले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही राजौरी येथे जवानांना श्रद्धांजली वाहिली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काल राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत स्फोटात प्राण गमावलेल्या लान्स नाईक रुचिन सिंग रावत यांना श्रद्धांजली वाहिली. लान्स नाईक रुचिन सिंग रावत हे चमोली जिल्ह्यातील गरसेन येथील रहिवासी होते.

Exit mobile version