कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचे वृत्त लावले Sakshi Malik ने फेटाळून

कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणारे भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट हे सर्व आता त्यांच्या नोकरीवर परतले आहेत.

कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचे वृत्त लावले Sakshi Malik ने फेटाळून

कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणारे भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट हे सर्व आता त्यांच्या नोकरीवर परतले आहेत. परंतु कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलेले नाही असे साक्षी मलिकने सांगितले आहे. असे सांगण्यात येत होते की साक्षी मलिकने कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार घेतली आहे. परंतु या सगळ्या बातम्यांचे खंडन केले आहे. यावर सर्व कुस्ती कुस्तीपटू म्हणाले की, न्यायालयाच्या लढामध्ये आमच्यापैकी कोणीही मागे हटणार नाही, न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे असे ते म्हणाले.

याआधी साक्षी मालिकचे पती सत्यव्रत कादियान यांनीही आंदोलनातून माघार घेतल्याच्या वृत्त समोर आले होते परंतु याला सुद्धा साक्षीने खंडन केले आहे. सर्व कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतरमंतर आंदोलन करत आहेत. भारतीय महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याआधी सुद्धा जानेवारीमध्ये कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात धरणे आंदोलन केले होते. परंतु क्रीडा मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर भारतीय कुस्तीपटू परतले.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर ७ महिला कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे २८ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये पहिली एफआयआर अल्पवयीन मुलाने केलेल्या आरोपांवर आधारित आहे. तर दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित आहे.

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version