महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय (budget) अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी २०२४- २०२५ या वर्षाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर केले. येत्या वर्षासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी सादर करण्यात आल्या आहेत. यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी २०२३ मध्ये सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेबद्दल अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरु करण्यात आली होती. यामध्ये लाभार्थी मुलीला तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यानं १ लाख १ हजार रुपये मिळतील, अशी या योजनेमध्ये तरतूद करण्यात आल्याचे विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी सांगितले.
लेक लाडकी योजनेनुसार, मुलींचा जन्म झाल्यानंतर ते मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली दिली आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलगी जन्माला आल्यानंतर ५००० रुपये देण्यात येणार आहेत. तर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख ७५ हजार रुपये देण्यात येतील.लेक लाडकी ही योजना गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुलींसाठी ही अभिनव योजना राबवण्यात आली आहे. मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत तिला योजनेतून आर्थिक मदत केली जाणार आहे. ही आर्थिक मदत मुलीचे वय १८ वर्ष होईपर्यंत केली जाणार आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर ५ हजार रुपये दिले जाणार आहे. राज्यभरातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लेक लाडकी या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लेक लाडकी योजनेतून मुलींना कशी मिळणार आर्थिक मदत?
मुलगी पहिलीमध्ये गेल्यानंतर तिला ६ हजार रुपये दिले जाणार आहेत.
मुलगी सहावीत गेल्यानंतर तिला ७ हजार रुपये मिळणार आहेत.
मुलगी अकरावीत गेल्यावर ८ हजार रुपये मिळणार आहेत.
मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये मिळणार आहेत.
हे ही वाचा:
राज ठाकरेंच्या हस्ते मराठी भाषा दिनानिमित्त ‘तिकीटालय’ अँप लॉंच