राज्यभरात आज ‘मराठी भाषा गौरव दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पुस्तक प्रदर्शन सोहळा पार पडला. या सोहळ्याला मनसे गटाचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी सगळ्यांना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या १५ कोटी पेक्षा जास्त मराठी भाषा बोलणारे लोक राहतात. दीड ते पावणे दोन कोटी लोक ही इतर भाषिक आहेत, बाकी सर्व मराठी आहेत. काही ठराविक नाटकं, चित्रपट सोडले तर तर प्रेक्षक पाहायला का जात नाही. सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या कात टाकण्याची गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, जी गोष्ट मला टीव्ही वर मोफत पाहायला मिळते, ती पाहण्यासाठी मी पैसे देऊन चित्रपटगृहात जाणार नाही, त्याव्यतिरिक्त काही मिळालं तर जाईन. हिंदी चित्रपटसृष्टी मोठी वाटते, पण तिथेही दणादण चित्रपट आदळत आहेत, कारण लोकांना तोच-तोचपण नको आहे. जे चित्रपट चालले आहेत, ते सहजासहजी टीव्हीवर पाहता येत नाहीत, त्यामुळे ते चालतात. कात टाकणं आवश्यक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ३० वर्षांपूर्वी राजकारणी लोक कोकणामध्ये गेले होते, त्यावेळी ते सांगायचे आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू आणि मग लोक त्यांना मतदान करायचे. पण ज्यादिवशी लोकांनी टीव्हीवर ‘बेवॉच’ चित्रपट पाहिला, तेव्हा त्यांना कळलं, हे आपल्याकडे नाही आणि कोणत्याही राजकारणी नेत्यांनी आतापर्यंत हे आणण्याचा प्रयत्न केला नाही, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की राजकारणी आपल्याला फसवत आहेत. त्यामुळे राजकारणी सुधारले, त्याप्रमाणे चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीने कात टाकणं आवश्यक आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
आज मराठी भाषा दिनानिमित्त ‘तिकीटालय’ हा अँप लॉंच करण्यात आला आहे. मराठी नाटक, चित्रपट आणि कार्यक्रमांच्या बुकिंगसाठी तिकिटालय अँप तयार करण्यात आला आहे. इतर अँपमध्ये मराठी कार्यक्रम कमी प्रमाणात दाखवले जातात, पण या अँपवर सर्व कार्यक्रम सविस्तर दाखवले जाणार आहेत. मराठी भाषा, मराठी चित्रपट, मराठी जे जे काही आहे, ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासून इच्छा आहे. त्यासाठी जे काही माझ्याकडून होईल, ते करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि त्यासाठी मला गृहीत धरलं तरी चालेल. मराठी चित्रपटसृष्टीसाठीही काहीतरी करण्याचा प्रयत्न, लवकरच ते समोर येईल, असे राज ठाकरे म्हणाले. नवीन कल्पना, नवीन संकल्पना येणे गरजेचे आहे. त्यासाठी माझ्यकडून जो काही हातभार लावता येईल त्या वेळी मी निश्चितपणे आपल्या पाठीमागे उभा राहीन. २००८ साली माझ्या पक्षाने मराठी भाषा दिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता हा दिवस साजरा केला जात आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
पुण्यामध्ये गुरुवारी ‘या’ भागात असणार पाणीपुरवठा बंद
देवेंद्र फडणवीस यांनी कोणावर निशाणा साधला?, जरांगे यांच्या मागे कोण…