टाटा ग्रुपने जगभरात भारताचा तुरा उंचावला

रिलायन्स (Reliance), अदानीं (Adani) अशा मोठ्या कंपन्यांना मागे टाकत टाटा कंपनीने (TATA Group) जगामधील टॉप कंपन्यांमध्ये बाजी मारली आहे. असे म्हंटले जाते की टाचणीपासून ते विमानपर्यत सर्वच टाटा कंपनी तयार करते.

टाटा ग्रुपने जगभरात भारताचा तुरा उंचावला

रिलायन्स (Reliance), अदानीं (Adani) अशा मोठ्या कंपन्यांना मागे टाकत टाटा कंपनीने (TATA Group) जगामधील टॉप कंपन्यांमध्ये बाजी मारली आहे. असे म्हंटले जाते की टाचणीपासून ते विमानपर्यत सर्वच टाटा कंपनी तयार करते. टाटा कंपनीने देशासाठी मोठे योगदान दिले आहे. आयोग्यामध्येच नाही तर संकटाच्या काळामध्ये सुद्धा टाटाने भारताला मोठी मदत केली आहे. म्हणूनच देशामधील प्रत्येक व्यक्तीला दादा ग्रुपविषयी आदर आहे. आता पर्यत अनेकवेळा टाटा ग्रुप अनेक कसोट्यांमध्ये खरी उतरली आहे.

आता पुन्हा एकदा टाटा कंपनीने जगभरामध्ये देशाचा तुरा उंचावला आहे. देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक कुटुंबांपैकी टाटा समूहाने एक मोठा पल्ला गाठला आहे. जगामधील नामचीन कंपन्यांमध्ये टाटा ग्रुपने आपला झेंडा रोवला आहे. आता जगामधील ५० कंपन्यांमध्ये टाटा ग्रुप २० व्या क्रमांकावर आहे. अजुनपर्यत कोणत्याही भारतीय कंपनीला हा सन्मान मिळालेला नाही. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या वतीने मोस्ट इनोव्हेटिव कंपनी २०२३ ची घोषणा करण्यात आली आहे.

या यादीमध्ये आयफोन तयार करणारी अमेरिकन कंपनी ॲप्पल या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर दुसऱ्या स्थानावर एलॉन मस्क (Elon Musk) यांची इलेक्ट्रिक कार टेस्ला ही आहे. अमेरिकेमधील ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन (Amazon) या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे तर अमेरिकेतील फार्मा कंपनी मॉडर्ना (Moderna), दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग (Samsung), चीनची हुआवे (Huawei) आणि बीवायडी कंपनी (BYD Company), सिमन्स (Siemens) या कंपन्याचा क्रमांक येतो. मेटा कंपनी या यादीमध्ये १६६ व्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version