Friday, April 19, 2024

Latest Posts

तेजस्वी यादव यांच्या गाडीला भीषण अपघात, अपघातामध्ये चालकाचा मृत्यू

मागील अनेक दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे.

मागील अनेक दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. सतत घडत असलेल्या रस्ते अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असाच गाडीचा अपघात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या गाडीच्या ताफ्याला झाला आहे. या भीषण अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला असून चालकाचा मृत्यू झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये जनविश्वास यात्रा आयोजित केली होती. या दरम्यानच हा भीषण अपघात झाला आहे. तेजस्वी यादव यांचा २० फेब्रुवारीपासून जनविश्वास यात्रेचा प्रवास सुरू झाला होता. या प्रवासादरम्यान तेजस्वी यादव सर्व ३८ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. त्यांच्या प्रवासाची सुरुवात मुझफ्फरपूरपासून झाली. तेजस्वी यादव यांचा हा प्रवास १ मार्च रोजी संपणार आहे.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या ताफ्याचा जनविश्वास यात्रे दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण यात जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास पूर्णियातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या बेलौरीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. एस्कॉर्ट वाहनाचा चालक मोहम्मद हलीम याचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. तर ९ पोलीससुद्धा यामध्ये जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या कारमध्ये असलेले ४ नागरिक जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या ५ जणांची प्रकृती सध्या गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी GMCH रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जनविश्वास यात्रेची सुरुवात २० फेब्रुवारीपासून झाली होती तर ही यात्रा १ मार्चला पूर्ण होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १४०० किलोमीटरचा रोड शो होणार आहे.

तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडी अपघातामध्ये गाडी चालकाचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत. पूर्णियातील बिलौरी पॅनोरमा हाईटजवळ हा भीषण अपघात घडला. जनविश्वास यात्रेच्या ताफ्यातील कारचे अचानक नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. कारचे नियंत्रण सुटल्यानंतर कारने दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर या कारमधून प्रवास करणारे ३ नागरिक जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या काही नागरिकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

लिमिटच्या बाहेर गेलं की काम करतोच; नाना पटोले आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संभाषणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss