Saturday, July 27, 2024

Latest Posts

लिमिटच्या बाहेर गेलं की काम करतोच; नाना पटोले आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संभाषणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गंभीर आरोप केले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सोमवारीपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दिवसभराचे अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर विधानभवनाच्या बाहेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्यातील चर्चा मनोज जरांगे यांच्या विषयी असल्याने राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा केल्या जात आहेत.

दिवसभराचे कामकाज संपवून नाना पटोले आणि मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनाच्या आवारात एकमेकांसमोर आले. त्यानंतर नाना पटोले एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलू लागले. त्यांच्या व्हिडिओतील आवाज अस्पष्ट असला तरीसुद्धा ते दोघे मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बोलत होते. हे काय चाललंय? असा प्रश्न नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, लिमिटच्या बाहेर गेलं की काम करतोच, यावर नाना पटोले म्हणाले, मला सांगा, तुम्ही त्याला वाढवलं ना? त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होते’ असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे आणि नाना पटोले यांच्यात मनोज जरांगे यांच्याबद्दल चर्चा सगळीकडे रंगली आहे. यावर आता मराठा आंदोलक कश्याप्रकारे व्यक्त होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर टीका केल्याने काल भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी रात्री पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे यांनी फडणवीसांबद्दल केलेल्या गंभीर आरोपांमुळे आगळिकडे निषेध व्यक्त केला जात आहे. मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. जरांगेंनी सरकारच्या संयमाची परीक्षा पाहू नये. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल असे काही करू नये. मनोज जरांगे यांची भाषा राजकीय आहे. त्याच्या मागे कोणतरी असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

हे ही वाचा:

Exclusive : Devendra Fadnavis यांना कोणी Disturb केलंय, Manoj Jarange Patil यांनी की BJP MLA नी?

Devendra Fadnavis यांना कोणी Disturb केलंय, Jarange नी की BJP MLA नी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss