Saturday, March 2, 2024

Latest Posts

गेल्या काही दिवसांपासून अँटिबायोटिक्सचं प्रमाण वाढल पण हे धोकादायक आहे का ?

अँटिबायोटिक्सचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन हा एएमआरच्या वाढत्या प्रादुर्भावास कारणीभूत असलेला प्रमुख घटक आहे. अनेक रुग्णांना असे वाटते की अँटिबायोटिक्स (बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरण्यात आलेले) हे सामान्य सर्दी आणि फ्लू प्रमाणे विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे.

बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक्स दिले जातात. गेल्या काही दिवसांपासून अँटिबायोटिक्सचं प्रमाण वाढलेय. लहान मुलांपासून पौढापर्यंत डॉक्टर अँटिबायोटिक्स देत आहेत. अँटिबायोटिक्सचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक का आहे? हा प्रश्न सध्या उद्भवलाय. त्याला कारणही तसेच आहे… आज सर्रास डॉक्टर अँटिबायोटिक्स देतात.. त्यामुळे त्या कालावधीत आजारावर झटक्यात मात होते, पण त्याचा शरीरावर दीर्घ असा परिणाम होत असल्याचे अनेकांचे मत आहे. अँटिबायोटिक्सबाबत नागपूर येथील संसर्गजन्य रोगतज्ञ डॉ. अश्विनी तायडे यांनी प्रकाश टाकलाय.

अँटीमायक्रोबियल (प्रतिजैविक) प्रतिकार (एएमआर) हा संपूर्ण जगात आरोग्यासाठी असलेला सर्व प्रमुख धोका आहे. अनेक व्यक्ती साधी सर्दी, पोटातील संसर्ग, छाती गच्च होणे, ताप वगैरे साठी अजाणतेपण अँटिबायोटिक्स घेतात, जे आरोग्य तज्ञांच्या मतानुसार चुकीचे आहे. जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) असे नमूद केले आहे की अँटिबायोटिक्स काऊंटरवर विकत घेऊन त्यांचा उपयोग करणे किंवा प्रिस्क्रिप्शन शिवाय (लिहून दिले नसताना) अँटिबायोटिक्स घेण्यामुळे, आपण अँटिबायोटिक पश्चात युगात प्रवेश करत आहोत, ज्यामध्ये न्यूमोनिया आणि फ्लुसारख्या सामान्य संसर्गांवर उपचार करणे देखील कठीण असेल त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती आणि आरोग्यावर परिणाम होईल आणि परिणामस्वरूप आरोग्यसेवेच्या खर्चामध्ये देखील वाढ होईल. त्याचप्रमाणे, रुग्णांनी त्यांना लिहून दिलेला औषधोपचारांचा कोर्स पूर्ण न करणे हे डब्ल्यूएचओने नमूद केल्याप्रमाणे एएमआरच्या वाढत्या प्रादुर्भावाचे एक प्रमुख कारण आहे. त्याचप्रमाणे, अलीकडे आयसीएमआर एएमआर यांच्या अहवालांमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की भारतातील अँटिबायोटिक्सच्या प्रमाणापेक्षा जास्त सेवनामुळे एएमआरच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अँटी मायक्रोबियल (प्रतिजैविक) प्रतिकार म्हणजे काय?

एएमआर म्हणजे जेव्हा बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी,आणि परजीवी जंतू यांच्यामध्ये कालांतराने बदल होतो आणि ते संसर्ग विरोधी औषधांना प्रतिसाद देत नाहीत आणि नेहमीपेक्षा संसर्ग बरा होण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे संसर्गावर उपचार करण्यास त्रास होतो, रोग पसरण्याच्या जोखमीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे त्याचे तीव्र स्वरूपाच्या किचकट संसर्गामध्ये रूपांतर होते आणि रुग्णालयात अघिक काळ राहावे लागते.

एएमआरचा किती लोकांना त्रास होतो?

दरवर्षी संपूर्ण जगात ७००,००० लोक एएमआरविरुद्ध लढा देण्यात अयशस्वी ठरतात आणि २०५० पर्यंत १० दशलक्ष व्यक्तींच्या त्यामुळे मृत्यू होईल असा अंदाज आहे. कर्करोग आणि रस्त्यावरील अपघात त्यामुळे मरणार्‍या लोकांच्या एकत्रित संख्येच्या तुलनेत एएमआर मुळे अधिक लोक मरण पावतात. संपूर्ण जगात भारतामध्ये औषधाला प्रतिकार करणार्‍या पॅथोजेन्सचे प्रमाण अधिक आहे आणि २०५० पर्यंत भारतात एएमआर मुळे मरणार्‍या लोकांची संख्या २ दशलक्ष असेल असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे, भारत हा अँटिबायोटिक्सचे सर्वाधिक सेवन करणारा अग्रणी देश आहे आणि त्यामुळे भारतात एएमआरचा प्रादुर्भाव देखील खूप जास्त आहे.

अँटिबायोटिक्सचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन तुमच्या आरोग्यासाठी का हानिकारक आहे?

अँटिबायोटिक्सचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन हा एएमआरच्या वाढत्या प्रादुर्भावास कारणीभूत असलेला प्रमुख घटक आहे. अनेक रुग्णांना असे वाटते की अँटिबायोटिक्स (बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरण्यात आलेले) हे सामान्य सर्दी आणि फ्लू प्रमाणे विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे अँटिबायोटिक्सचे अनावश्यक सेवन केले जाते आणि दीर्घ कालावधीत पॅथोजेन्स या उपचारांना प्रतिकारक्षम बनतात. त्याचबरोबर, अनेक रुग्णांना त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचे दिसून आल्यास ते त्यांचे अँटिबायोटिक्सचे उपचार मध्येच बंद करतात आणि अशाप्रकारे अँटिबायोटिक्सचे उपचार मध्येच बंद केल्यास त्यामुळे देखील एएमआर होऊ शकतो.

अॅन्टिबायोटिक्सचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्यामुळे विषाणू किंवा बॅक्टेरिया हे त्या औषधाला प्रतिकार करण्यास सक्षम बनतात. जेव्हा सूक्ष्म जिवाणू (मायक्रो-ऑरगॅनिझम) औषधांना प्रतिकार करत नाहीत आणि त्यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण होते तेव्हा शरीरात त्यांची वाढ होणे सुरू राहते आणि अशा प्रकारे गंभीर आणि किचकट स्वरूपाचा संसर्ग होतो. यामुळे त्यानंतर रुग्णालयात अधिक काळ राहावे लागते, दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात, उपचारांच्या खर्चात वाढ होते आणि त्यामुळे जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो.वय किंवा लिंग काहीही असले तरी एएमआरचा कोणालाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे एएमआरला प्रतिबंध करण्यासाठी अॅन्टिबायोटिक्सचा प्रामाणिकपणे आणि खबरदारीने उपयोग करणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येक रुग्णाला संपूर्ण माहिती देणे, अधिक संवेदनशील बनविणे आणि प्रशिक्षण देण्याची गरज आहे ज्यामुळे साध्या सर्दी, फ्लु आणि इतर विषाणू संसर्गासाठी ते लिहून न देता अँटिबायोटिक्स घेणे बंद करतील.

एएमआरचे व्यवस्थापन कसे करावे?

एएमआरचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी काही ठराविक उपाययोजना करता येऊ शकतात.

हाताच्या स्वच्छतेतील सुधारणाः लहान मुले, प्रौढ व्यक्ती, वरिष्ठ नागरिक यांच्यामध्ये हाताच्या स्वच्छतेसंबंधी सवयी लावून घेणे.

अँटिबायोटिक्सच्या सेवनावर देखरेख ठेवणेः काही आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास स्वतः औषधोपचार करण्याऐवजी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे मध्येच उपचार बंद करू नयेत. अॅन्टिबायोटिक्स रेझिस्टन्स ब्रेकर (एआरबी) नावाचे नव्या जमान्यातील औषध सादर करणे.

अँटिबायोटिक रेजिस्टन्स ब्रेकर (एआरबी) म्हणजे काय?

एएमआरचा वाढता प्रादुर्भाव हाताळण्यासाठी पर्यायी उपचारांची आखणी करण्यात आली आहे ज्यात अँटिबायोटिक्सच्या वापराची संख्या कमी करणे आणि अधिक चिकित्सिय उपयोगासाठी सध्याच्या श्रेणीचे जतन करणे, असा याचा एकत्रित उद्देश आहे. अशाच एका आशादायक मार्ग असलेल्या संशोधनात अँटिबायोटिक रेजिस्टन्स ब्रेकर्स (एआरबी)चा उपयोग करणे समाविष्ट आहे, जे अँटीबायोटिक्सला प्रतिकारक्षम असलेल्या बॅक्टेरियाला पुन्हा संवेदनशील बनविते. हे असे घटक आहेत जे त्यांच्याविरुद्ध तयार करण्यात आलेल्या प्रतिकार यंत्रणेविरुद्ध लढा देऊन सध्याच्या अँटिबायोटिक्सच्या परिणामकारकतेत वाढ करू शकतात. या गुप्त जीवघेण्या आजाराला प्रतिकार करण्यासाठी अधिक सक्षम समग्र पद्धतीची आवश्यकता आहे. अँटिबायोटिक्सचा असमंजसपणे उपयोग करण्यासंबंधी जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे.

हे ही वाचा:

Politics: RAJASTHAN आणि MAHARASHTRA मिळून सहकार्याचा अध्याय सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे एकमत

माधुरी दीक्षित  यांच्या ‘पंचक’ चित्रपटाची बॉलिवूडलाही पडली भुरळ,कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss