Saturday, July 27, 2024

Latest Posts

एकाच वेळी तीन व्यक्तींना भारत सरकारने जाहीर केला भारतरत्न पुरस्कार, चौधरी चरणसिंह, नरसिंह राव ,स्वामीनाथन यांना भारतरत्न

भारतरत्न (Bharat Ratna) हा पुरस्कार देशातील सर्वच्च नागरी पुरस्कार आहे.

भारतरत्न (Bharat Ratna) हा पुरस्कार देशातील सर्वच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये सर्वच्च कामगिरी करणाऱ्या आणि एखाद्या क्षेत्रामध्ये असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकारकडून भारतरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. राजकारण, कला, साहित्य, क्रीडा,विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. भारत सरकारने यंदाच्या वर्षी तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. चौधरी चरण सिंह, नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन (मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार) यांना यंदाच्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींनी एकामागोमाग तीन ट्विट केले. गेल्या आठवड्यामध्ये माजी उपपंतप्रधान लाल कृष्ण आडवणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत. नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे, देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित करण्यात येत आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे.

१९०२ मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्हयातील नूरपूर येथे चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला आहे. १९३७ मध्ये ते छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेमध्ये निवडून आले. त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद मिळाले. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर ते १९७९ साली देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान बनले. त्या काळातच त्यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड या संस्थेची स्थापना केली. त्यांनी जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरीबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन, प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम, को-ऑपरेटीव फार्मिंग एक्स-रेड या सर्व विषयांवर पुस्तक लिहिले आहे.

हे ही वाचा: 

अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसचा मृतदेह चर्चमध्ये दफन करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक महिला किंवा पुरुष प्रवक्ता;विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss