Saturday, July 27, 2024

Latest Posts

क्राउडफंडिंग मोहिमे अंतर्गत देणगी देणाऱ्यांना मिळणार राहुल गांधींची सही असलेलं टी-शर्ट

काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय' यात्रेला  सुरुवात झाली आहे.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय’ यात्रेला  सुरुवात झाली आहे. या यात्रेला निधी देण्यासाठी आपली ‘डोनेट फॉर जस्टिस’ क्राउडफंडिंग ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये देणगी देण्याच्या बदल्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट आणि पत्र मिळणार आहे. या मोहिमेचा नवी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांच्या हसे शुभारंभ करताना काँग्रेसचे खजिनदार अजय माकन म्हणाले, या मोहिमेमध्ये ६७० आणि त्याच्यापेक्षा जास्त देणगी देणाऱ्या व्यक्तीला राहुल गांधींची स्वाक्षरी असलेली भेटवस्तू मिळेल आणि टी-शर्ट मिळेल, असे अजय माकन म्हणाले.

डोनेट फॉर जस्टिस क्राउडफंडिंग या मोहिमेमध्ये जे ६७० किंवा त्याच्यापेक्षा अधिक देणगी देतील त्यांना ‘न्याय किट’ मिळणार आहे. त्याच्यामध्ये टी-शर्ट, बॅग, बँड, बॅज आणि स्टिकर असणार आहे. तसेच जो कोणी व्यक्ती देणगी देईल, त्याला राहुल गांधी यांची स्वाक्षरी असणारे पत्र मिळेल. तसेच अजय माकन यांनी सांगितले आहे, या मोहिमेमागील संकल्पना आणि पक्षाच्या पहिल्या मोठ्या क्राउडफंडिंग मोहिमेचा उद्देश ‘डोनेट फॉर देश’ हा पैसा मिळवण्यासाठी नव्हता तर कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी होता.गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी सुरु करण्यात आलेल्या डोनेट फॉर देश’ क्राउडफंडिंग मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण २० कोटी रुपये जमा झाले होते. ‘डोनेट फॉर जस्टिस’ ही मोहीम सुरु झाल्यानंतर २ तासांच्या आतमध्ये कोटी रुपये जमा झाले होते. त्यावर अजय माकन म्हणाले, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पैसे उभे करून निवडणूक लढवू शकत नाही. या क्राउडफंडिंगद्वारे निवडणुकीसाठी आमचा सर्व निधी मिळेल, असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे आणि हे असेच काहीतरी आहे.

काही काळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे. इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केलेल्या क्राउडफंडिंगपेक्षा हे जास्त आहे. कारण आप आणि भाजप या दोन्ही पक्षांनी याची सुरुवात केली होती, पण ते १ कोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ विश्रांतीसाठी २६ आणि २७ जानेवारी दिवस थांबली होती. रविवार पासून पुन्हा एकदा या यात्रेला सुरुवात होणार आहे.

हे ही वाचा:

ग्रॅन्ड फिनालेच्या आधी अमृता खानविलकरने बिग बॉसच्या घरात जाऊन घेतली अंकिता लोखंडेची भेट

आरक्षण कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंची सरकारवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss