Friday, April 19, 2024

Latest Posts

भारतातील ‘या’ पर्यटन स्थळांना दरवर्षी हजारो पर्यटक देतात भेट

भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत.

भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. या पर्यटन स्थळांना जागतिक वारसा लाभला आहे. बाहेर फिरायला जायला सगळ्यांनाच आवडत. पर्यटनामुळे मन फ्रेश होतं. एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला गेल्यानंतर नव्या जागा, तिथली संस्कृती पाहायला मिळते. भारतामध्ये अनेक धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत. पर्यटकांना नवनवीन ठिकाणांची माहिती मिळाल्यानंतर पर्यटनाला आणखी चालना मिळू शकेल. देश विदेशातील पर्यटन स्थळांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन दिवस साजरा केला जातो. भारतामध्ये अशी काही फिरण्याची ठिकाणं आहेत ज्याची देशातीलच नाही तर विदेशातील लोकांना देखील भुरळ पडली आहे. भारतातील या ठिकाणांना पाहून अनेक परदेशातील पर्यटक आकर्षित झाले आहेत. कोणती आहेत ती ठिकाण जाणून घेऊया..

वाराणसी

वाराणसी हे भारताच्या उत्तर प्रदेशातील एका राज्यातील शहर आहे. काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने या शहराला वाराणसी हे नाव पडले. वाराणसी हे एक धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी वाराणसीमध्ये देशविदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. वाराणसी हे देशभरातील विद्यार्थी आणि विद्वानांना आकर्षित करणारे भारतातील पुरातन शिक्षणाचे केंद्र आहे. गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेल्या वाराणसीला प्राचीन शहराचे महत्च आहे. काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. वाराणसीमधल्या प्रत्येक गल्लीमध्ये एक मंदिर आहे.गंगा नदीच्या तीरावर केली जाणारी गंगा आरती सगळीकडे प्रसिद्ध आहे.

गोवा

गोवा हे राज्य सगळ्यात कमी लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे राज्य आहे. भारत आणि विदेशातील सर्वाधिक पर्यटक गोव्यामध्ये फिरण्यासाठी जातात. गोवा हे राज्य निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. गोव्याला देशाची फन कॅपिटलही म्हणतात. गोव्यामध्ये पर्यटक मजा, मस्ती, सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येतात. गोव्यामध्ये बीचेस, नाईट पार्टी, क्रूज पार्टी अश्या विविध गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. गोवा हे राज्य पर्यटनाचे केंद्रबिंदू आहे.

आग्रा

आग्रा हे जगभरातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. हे आश्चर्य भारतामध्ये आहे. आग्ऱ्यातील ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक आहे. ताजमहल पाहण्यासाठी भारतासह देशविदेशातील अनेक पर्यटक आगऱ्यामध्ये जातात. ताजमहाल व्यतिरिक्त, ताज संग्रहालय, इतिमाद-उद-दौला, अकबराचा मकबरा आणि आग्रा येथील लाल किल्ला ही प्रसिद्ध ठिकाणं आहेत. ताजमहलच्या सौंदर्यची ख्याती जगभरात आहे.

जयपूर

राजस्थानमधील प्रत्येक शहरात पर्यटनस्थळे आहेत. जयपूरला ‘गुलाबी शहर’ म्हणूनही ओळखले जाते. जयपूर, उदयपूर आणि जैसलमेरपासून अजमेरपर्यंत अनेक किल्ले, राजवाडे आणि धार्मिक स्थळे येथे आहेत. ही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी लाखो पर्यटक राजस्थानमध्ये येतात. जयपूरमध्ये हवा महल, अंबर पॅलेस, सिटी पॅलेस, जंतर मंतर, नाहरगढ किल्ला आणि जयपूर किल्ला ही सर्व प्रेक्षणीय स्थळं आहेत.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil खरंच शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालतायत का? | Sharad Pawar | Maratha Reservation

अजय देवगणच्या आगामी ‘शैतान’ चित्रपटाचा अंगावर शहारे उमटवणारा ट्रेलर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss