Sunday, April 28, 2024

Latest Posts

अजय देवगणच्या आगामी ‘शैतान’ चित्रपटाचा अंगावर शहारे उमटवणारा ट्रेलर प्रदर्शित

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवनचा बहुचर्चित अशा ‘शैतान’ या चित्रपटाचा जबरदस्त असा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवनचा बहुचर्चित अशा ‘शैतान’ या चित्रपटाचा जबरदस्त असा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.तर या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी समोर आले होते.त्यानंतर आता या चित्रपटाच्या थरारक ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.अजय देवगण, ज्योतिका आणि आर माधवन यांच्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहेत. आर माधवनचा नुकताच व्हायरल झालेला लूक हा त्या चित्रपटाविषयी खूप काही सांगून जाणारा होता. त्यातील त्याची भूमिका व्हिलनच्या रुपातील असून या चित्रपटाच्या निमित्तानं मॅडी वेगळ्याच भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. अजयनं त्याच्या या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. विकास बहल यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

या चित्रपटाचे याआधी टीझर आणि आता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले.दरम्यान ट्रेलर आणि टीझरला प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीस उतरला आहे.शैतानच्या ट्रेलरची सुरुवात एका घरापासून होते.मोबाईल फोनची बॅटरी डेड झाल्याने फोन चार्जिंगसाठी 15 मिनिटे मागणाऱ्या माधवनला अजय देवगण माणुसकीच्या नात्याने फोन चार्ज करण्याची मुभा देतो. मात्र, त्याच वेळी ज्योतिकाला त्याच्यावर संशय येतो आणि अजय देवगणला त्याला घरातून निघून जाण्यास सांगते. अजय देवगण ज्यावेळी त्याला घरा बाहेर जाण्यास सांगतो तेव्हा अजय देवगणची मुलगी माधवनच्या बाजूने उभी राहते आणि त्याला घरात थांबवण्यासाठी आग्रह धरते. इतकंच नव्हे तर माधवन जसे सांगतो तसे ती मुलगी वागते. नेमकं माधवनने केले काय, अजय देवगण-ज्योतिकावर कोणता बाका प्रसंग ओढावतो. त्यांची मुलगी माधवनचे कसं काय ऐकते, असा थरारक चित्रण या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.या चित्रपटाचे ट्रेलर पाहुन प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे.

या चित्रपटात आर माधवननं भयानक अशी भूमिका साकारली आहे.यात तो राक्षसाची भूमिका साकारत आहे.जो कुणालाही आपल्याकडील शक्तीनं वश करुन घेऊ शकतो. हा चित्रपट येत्या ८ मार्च पासून सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘शैतान’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री ज्योतिका २५ वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. १९९७ मध्ये तिचा ‘डोली सजा के रखना’ हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.त्यानंतर पुढे दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत तिने पाऊल ठेवलं. दरम्यान आता प्रेक्षकांना शैतान या चित्रपटाची उस्तुकत्ता आहे.

हे ही वाचा:

Gajanan Kirtikar यांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका, उत्तर – पश्चिममधून कीर्तिकरांना मिळणार नारळ

नाशिकमधील ‘या’ भागांत पाणीपुरवठा असणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss