Saturday, July 27, 2024

Latest Posts

मुकेश अंबानीनंतर रतन टाटा यांना धमकी

देशातील प्रसिद्ध उद्योगपती यांना धमकी देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती यांना धमकी देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांना याआधी धमक्यांचे फोन आले होते. त्यातच आता टाटा समूहाचे मानद चेअरमन रतन टाटा (Ratan Tata) यांना धमकीचा फोन आला आहे. धमकी देणाऱ्याने ‘रतन टाटा यांची सुरक्षा वाढवून टाका, अन्यथा त्यांचे हाल सायरस मिस्त्री सारखे होईल’, या शब्दात धमकी दिली आहे. धमकीच्या फोननंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत. पोलिसांनी आपल्या एका टीमला रतन टाटा यांच्या सुरक्षकडे लक्ष ठेवण्याचे काम दिले तर दुसऱ्या टीमने फोन करणाऱ्याचा शोध सुरु केला आहे. मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाली आहे.

धमकीचा फोन आल्यानंतर रतन टाटा यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. फोन करणाऱ्याने रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा, अन्यथा त्यांचे सायरस मिस्त्री होईल, असे सांगितले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. तसेच त्याचा तपास देखील सुरु आहे. पोलिसांनी फोन कुठून आला, त्याचा तपास सुरु केला. पोलिसांनी धमकी देणाऱ्या कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले. तो कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या घरी गेल्यानंतर पाच दिवसांपासून ते बंद असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीचा पत्ता शोधला असता फोन करणारा पुणे येथील रहिवासी असल्याचे समोर आले. हा आरोपी मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे.

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनाही यापूर्वी धमकी मिळाली होती. एका ईमेल मार्फत त्यांना ही धमकी देण्यात आली. त्यांच्याकडून वीस कोटी रुपये मागण्यात आले होते. पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती. २७ ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांना ही धमकी मिळाली होती. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एका व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलला फोन केला होता. त्याने रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.

हे ही वाचा:

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

महाराष्ट्रात कांद्याचे भाव घसरले, नेपाळमध्ये २०० तर श्रीलंकेत ३०० रुपये किलोवर कांदा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss