Saturday, March 2, 2024

Latest Posts

Rekha jhunjhunwala-६५० कोटी कमावणाऱ्या रेखा झुनझुनवाला आहेत तरी कोण ?

एका महिन्यात तब्बल ६५० कोटींची प्रचंड कमाई झाली आहे.

प्रत्येकाचा पैसा कमावणं हा एकच हेतू असतो . पण जर तुम्हाला एकाच महिन्यात ६५० कोटी कमवायला सांगितले तर ऐकूनच धक्का बसलाना हो पण हे शक्य आहे. एका महिन्यात तब्बल ६५० कोटींची प्रचंड कमाई झाली आहे. हा आकडा नक्कीच स्वप्नवत वाटत असला तरी तो खरा आहे. रेखा झुनझुनवाला (Rekha jhunjhunwala) यांनी ही रक्कम कमावली आहे. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा यांनी ३ स्टॉकमधून हे पैसे कमावले आहेत.या स्टॉकने (Stock) २०२३ मध्ये रेखा झुनझुनवाला यांना मोठा परतावा दिला आहे. त्यांनी टायटनमधील त्याच्या ५. ४ टक्के हिस्सेदारीतून सर्वाधिक कमाई केली आहे.

रेखा झुनझुनवाला यांना मोठा परतावा कसा मिळाला आहे.
मल्टीबॅगर स्टॉक हे कोणत्याही कंपनीचे इक्विटी शेअर्स असतात. ते त्याच्या किमतीच्या अनेक पट परतावा देऊ शकते. इकॉनॉमिक टाईम्नं दिलेल्या अहवालानुसार, या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरहोल्डिंग रचनेनुसार झुनझुनवाला यांच्याकडे २५ समभाग आहेत. या तिमाहीत त्यांचे मूल्य १४ टक्क्यांनी वाढून ३९००० कोटी रुपये झाले आहे. फक्त अशा कंपन्यांची माहिती देण्यात आली आहे, ज्यात त्यांचा हिस्सा १ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

रेखा झुनझुनवाला यांना मोठा परतावा
मल्टीबॅगर स्टॉक हे कोणत्याही कंपनीचे इक्विटी शेअर्स असतात. ते त्याच्या किमतीच्या अनेक पट परतावा देऊ शकते. इकॉनॉमिक टाईम्नं दिलेल्या अहवालानुसार, या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरहोल्डिंग रचनेनुसार झुनझुनवाला यांच्याकडे २५ समभाग आहेत. या तिमाहीत त्यांचे मूल्यन १४ टक्क्यांनी वाढून 39000 कोटी रुपये झाले आहे. फक्त अशा कंपन्यांची माहिती देण्यात आली आहे, ज्यात त्यांचा हिस्सा १ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

टाटा मोटर्स डीव्हीआर शेअर्समध्ये १३८ टक्क्यांनी वाढ
यावर्षी टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअर्समध्ये १३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा त्याच्या पोर्टफोलिओमधील सर्वात मजबूत कामगिरी करणारा स्टॉक आहे. रिपोर्टनुसार, रेखा झुनझुनवाला यांची या कंपनीत १. ९८ टक्के हिस्सेदारी आहे.

डीबी रियल्टी १०८ टक्क्यांनी वाढली
गुंतवणूकदार रेखा यांची डीबी रियल्टीमध्ये २ टक्के भागीदारी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये १०८ टक्क्यांची वाढ झाली आहे. पायाभूत सुविधा आणि रस्ते बांधकाम कंपन्यांचे समभाग यावर्षी जवळपास दुप्पट झाले आहेत.

झुनझुनवाला कुटुंबाची टायटनमध्ये सर्वाधिक भागीदारी
झुनझुनवाला कुटुंबाची टायटनमध्ये सर्वात जास्त भागीदारी आहे.जिथे त्यांची हिस्सेदारी सुमारे ५. ४ टक्के आहे. टायटनच्या शेअर्समध्ये यंदा ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. झुनझुनवाला कुटुंबाची संपत्तीही 17 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.या अब्जाधीशाने मार्च ते जून दरम्यान टायटनमध्ये गुंतवणूक केली होती.

रेखा झुनझुनवाला यांचीही टाटा मोटर्समध्ये १. ६ टक्के भागीदारी
रेखा झुनझुनवाला यांची टाटा मोटर्समध्ये १. ६ टक्के भागीदारी आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे ३८०० कोटी रुपये आहे. कंपनीच्या समभागात यंदा ८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टायटन आणि टाटा मोटर्स टाटा समूहाच्या मालकीच्या आहेत.

या कंपन्यांचाही त्याच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश
रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये VA Tech Wabag, Wockhardt, Geojit Financial Services, Nazara Technologies, Karur Vysya Bank आणि Metro Brands यांचाही समावेश आहे.

हे ही वाचा:

THANE: आता एसटी महामंडळाचे तिकीट DIGITAL स्वरुपात, सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार

देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, खासदार संजय राऊतांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss