Tuesday, April 23, 2024

Latest Posts

२०२४ च्या अर्थसंकल्पात करदात्यांना सवलत मिळणार का? कर वाढण्याची शक्यता

१ फेब्रुवारी २०२४ ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यंदाच्या वर्षातील अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

१ फेब्रुवारी २०२४ ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यंदाच्या वर्षातील अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हे अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. मोदी सरकारच्या काळातील हा अंतिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. जाहीर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात आयकर सवलत मर्यादेत वाढ (Income Tax Exemption Limit), महिला उद्योजकांना पाठिंबा, दीर्घकालीन कर धोरण आणि उपभोग, तसेच, बचतीला (Savings) चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण जैन यांच्या मते, हा अंतिम अर्थसंकल्प असणार आहे. परंतु त्यात पूर्ण-बजेटसाठी काही संकेत असू शकतात. कलम ८७A अंतर्गत वैयक्तिक करदात्यांना काही सवलती दिल्या जाऊ शकतात. या अंतर्गत एकूण कर सवलत मर्यादा ७ लाख रुपयांवरून ८ लाख रुपये केली जाऊ शकते, असे जैन म्हणाले आहेत. लहान आणि मध्यम कंपन्यांना समान संधी देण्यासाठी कंपन्या, भागीदारी आणि मर्यादित दायित्व भागीदारी (LLPs) यांच्यात दीर्घकालीन कर धोरण आणि कर आकारणीत एकन समानता आणण्याची गरज आहे. देशाच्या जीडीपी (GDP) आणि रोजगार निर्मितीमध्ये एमएसएमईचे (MSME) मोठे योगदान असताना त्यांच्यावर अधिक कर आकारला जात आहे.

येत्या १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४ चा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. निर्मला सीतारामन या सहाव्यांदा अर्थसंकल्प जाहीर करणार अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर त्या मोरारजी देसाईंशी बरोबरी करणार आहेत. यंदा लोकसभेच्या निवडणूका आल्या आहेत. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

रणबीर-आलियाला मिळाला फिल्मफेअर अवार्ड,नितू कपूर यांनी पोस्ट शेअर करत केलं अभिनंदन

छगन भुजबळ यांच्या भूमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहमत नाही – बबनराव तायवाडे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss