अभिनेत्री मिथिला पारकरच्या गोल्डिश अंदाजाने वेधलं लक्ष

अभिनेत्री मिथिला पारकरच्या गोल्डिश अंदाजाने वेधलं लक्ष

अभिनेत्री मिथिला पारकरच्या गोल्डिश अंदाजाने वेधलं लक्ष

मराठमोळी अभिनेत्री मिथिला पारकर हिच्या कलागुणांमुळे तिच्या अभिनय कौशल्यामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे.दरम्यान मिथिलाच्या सौंदर्याने तर अनेक तरुणाच्या मनावर भूरळ घातली आहे.

मिथिला ही तिच्या बोल्ड आणि बिंधास्त अंदाजामुळे तसंच तिच्या लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
मिथिला पालकरही तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या अप्रतिम स्टाइल स्टेटमेंटमेंटमुळे देखील चांगलीच चर्चेत असते,तिच्या चाहत्यांना ती या स्टाइलमुळे विशेष पसंतीस उतरत असते.
मिथिला ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते,ती तिचे वेगवेगळ्या लूक वरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते,तिच्या प्रत्येक पोस्टला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतो,दरन्यान मिथिलाचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे.
नुकतच मिथिलाने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.त्यात तिचा लूक फारच अप्रतिम दिसत आहे.शेअर केलेल्या फोटोंमध्ये मिथिलाने गोल्डन कलरचा लेहंगा परिधान केला आहे,त्यावर गोल्डन आणि डिझायनर वर्कने भरलेलं सिल्वलेस ब्लाउज तिने घातलं आहे.
मिथिलाने या लेहंग्यावर मोठे कानातले आणि चोकर टाईप डायमन्ड नेकलेस घातला आहे.मिथिलाचे केस म्हणजे तिच्या सौंदर्याची खासीयत आहे,असं म्हणायला हरकत नाही,या लेहंग्यावर तिचे ते कुरळे केस आणि न्यूड मेकअप करत तिने तिचा लूक संपूर्ण केला आहे.
मिथिलाच्या या लूकला तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद देत लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 

Exit mobile version