अजितदादा तुमच्यात धाडस असेल तर…..रोहित पवारांचं अजित पवारांना ओपन चॅलेंज

अजित पवार म्हणायचे शरद पवार माझं दैवत आहे.आपण कधी आपलं दैवत सोडतो का? हे फक्त सत्तेसाठी शरद पवारांसोबत होते.भाजपच सरकार येणार नाही हे सर्वांना ४ जूनला समजेल" असे ही रोहित पवारांनी बारामतीकरांना सांगितले. 

अजितदादा तुमच्यात धाडस असेल तर…..रोहित पवारांचं अजित पवारांना ओपन चॅलेंज

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांचा रोष हा दिवसेंदिवस वाढत जात आहे. आज दौंड तालुक्यातील वरवंडयेथे बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे(Supriya sule ) यांच्या प्रचारासाठी शरद पवार(Sharad pawar ) यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार(Rohit pawar ) यांनी “काका”अजित पवारांना खुलं आव्हान दिलं आहे.

शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव, आप नेत्या प्रिती मेनन आणि रोहित पवार, हे नेते या सभेला उपस्थित आहेत. या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिकांना संबोधित करत म्हणाले, “आमचं कुटुंब फोडलं. आमचा एक नेता पळून नेला आणि इथं उभं केलं. त्यांना वाटत होतं की शरद पवार हे या मतदादरसंघात अडकून पडतील. पण शरद पवारांनी राज्यात ५४ सभा घेतल्या”असं म्हणत आमदार रोहित पवारांनी अजित पवारांवर सडकून टीका केली.

“अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर, किरीट सोमय्या यांना तुमच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ बोलवून दाखवा. महाराष्ट्र कधीच गुडघ्यावर येत नाही. आमचा हा वस्ताद तुम्हाला गुडघ्यावर आणेल. तुम्हाला येऊन धमक्या देत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका” अशा शब्दात रोहित पवारांनी भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना ओपन चॅलेंज दिलं.”जे आता सरकारमध्ये गेले आहेत त्यांना स्वतंत्र निर्णय घेता येत नाही त्यांना चार वेळा टेबल फिरवावे लागतात.माझ्या मतदारसंघात अजित पवारांचा साखर कारखाना आहे.” असा रोहित पवारांनी अजित पवारांना सणसणीत टोला लगावला.

पुढे ते म्हणाले,”सुप्रियाताईंना तिसऱ्यांदा खासदार करायचं आहे. ही निवडणूक आपण सर्व भाजपच्या विरोधात लढत आहोत. ही लढाई शरद पवारांविरुद्ध भाजपची आहे. सामान्य नागरिक विरूद्ध भाजप आहे. जनतेसाठी या लोकांनी काय केलं? सामन्य लोकांच्या हितासाठी हे सत्तेत गेले नाहीत तर जेल मध्ये जाऊ नये म्हणून ते भाजपसोबत गेले आहेत. जर ते सामान्य लोकांसाठी गेले असते तर आज दुधाची किमंत २५ रुपये नसती.जे आता सरकारच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्यांनी एकदाही शेतकऱ्यांसाठी शब्द काढला नाही”.

दरम्यान,”अजित पवार म्हणायचे शरद पवार माझं दैवत आहे.आपण कधी आपलं दैवत सोडतो का? हे फक्त सत्तेसाठी शरद पवारांसोबत होते.भाजपच सरकार येणार नाही हे सर्वांना ४ जूनला समजेल” असे ही रोहित पवारांनी बारामतीकरांना सांगितले.

हे ही वाचा:

Rohit Vemula प्रकरणामुळे Prakash Ambedkar यांचे Congress वर ताशेरे

माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत, यांच्यासारखा चिंधीचोर नाही, Kalyan Kale यांची Raosaheb Danve यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version