बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा धाडेने व्यक्त केला संताप,’अनादर करणारा नेता महाराष्ट्राला नको’

देशभरात निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. अश्या वेळी प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारामध्ये व्यस्त आहे. अश्यात बरीच कलाकार मंडळीही यात उतरलेली दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मेघा धाडे हिने देखील भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा धाडेने व्यक्त केला संताप,’अनादर करणारा नेता महाराष्ट्राला नको’

देशभरात निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. अश्या वेळी प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारामध्ये व्यस्त आहे. अश्यात बरीच कलाकार मंडळीही यात उतरलेली दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मेघा धाडे हिने देखील भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. तेव्हापासून अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्ट चांगल्याच चर्चेत असतात. नुकतीच तिने कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर टीका करत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये तिने राहुल गांधीविरोधात संताप व्यक्त केला आहे.

काही दिवसांआधी पुण्याच्या एका सभेत राहुल गांधी यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि पगडी देऊन सन्मान करण्यात आला. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडिया वरती चांगलाच व्हायरल होत असून भाजपचे नेते राजेश पांडे यांनी हा व्हिडीओ शेअर करत ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारा नेता महाराष्ट्राला नको’ असे म्हणाले आहे. हा व्हिडीओ मेघा धाडे यांनी आपल्या इन्टाग्रामच्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

राजेश पांडे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये राहुल गांधींना दिली जाणारी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वारंवार बाजूला सारण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. यावर राजेश पांडे यांनी ‘ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारा नेता महाराष्ट्राला नको’ असे लिहत राहुल गांधीवर टीका केली. तसेच ‘काँग्रेसच्या राहुल गांधींचा धिक्कार असो, आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत केला’. तसेच ‘पुणेकरांच्या मनात राहुल गांधींसाठी जागा नाही’ असेही ते म्हणाले. हीच पोस्ट मेघा धाडे हिने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली की, ‘जे लोक राहुल गांधींना सपोर्ट करतात. त्यांची लाज वाटते. राहुल गांधी तुमचा तिरस्कार वाटतो. माझा देश सोडून नरकात जा’. असे म्हणत तिने राहुल गांधी यांच्या “त्या”कृत्याचा विरोध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. 

हे ही वाचा:

कांदा निर्यातबंदी लावण्याची आधी गरजचं काय होती ? शेतकरी नेत्यांचा केंद्र सरकारला सवाल

“राज ठाकरेंचा देव बदलु शकतो” ;संजय राऊतांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version