Mother’s Day का साजरा करतात तुम्हाला माहिती आहे का?

Mother’s Day का साजरा करतात तुम्हाला माहिती आहे का?

आई या शब्दातच प्रेम दडलेले आहे. मुलांच्या चुका माफ करणारी आई, संकटाच्या वेळी खंबीरपणे साथ देणारी आई साक्षात परमेश्वराचे रूप आहे. ज्यादिवशी आईबद्दल भरभरून बोलले जाते तो दिवस म्हणजे ‘मातृदिन’. ‘जागतिक मदर्स डे” (Mother’s Day) हा १२ मे ला साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येतो. काही देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का मदर्स डे का साजरा केला जातो ते? चला तर मग जाणून घेऊयात..

प्रत्येक आई ही स्वतःच्या बाळाला ९ महिने पोटात वाढवत असते. जन्माच्या अगोदरपासुनच ती आपल्या बाळावर नितांत प्रेम करत असते. नेहमी साथ देते. कधी स्वतःच्या जीवाची पण परवा करत नाही. कधीकधी ती आईच्या भूमिकेबरोबरच वेगवेगळ्या भूमिका बजावताना दिसते. त्यामुळे आईच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात अमेरिकन महिला एन्ना मारिया जार्विस हिने केली. एन्नाला तिच्या आईवर खूप प्रेम होत. आईच्या निधनानंतर लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला होता. आपले जीवन आईच्या नावावर जगण्याचा तिने संकल्प केला. लहानाचं  मोठ केल्याबद्दल तिचा सन्मान करण्यासाठी म्हणून मदर्स डे साजरा करण्यात आला. अमेरिकन संसदेत म्हणून हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा करतात. युरोप, भारत, अमेरिका या देशात पण साजरा केला जातो.

मदर्स डे हा दिवस प्राचीन काळापासून साजरा केला जातो. काही लोक वेगेवगळ्या प्रकारे आईसोबत वेळ घालवतात. या दिवशी आईला वेगवेगळ्या प्रकारचे भेटवस्तू देतात. बाहेर जेवयला जातात. अनेकजण घरच्या घरी पार्टीचे आयोजन करतात.

हे ही वाचा:

Body Shaming बद्दल काय म्हणाली Sonali?

आजारपणानंतर Sheyasचे Comeback, नवा चित्रपट घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version