Wednesday, February 28, 2024

Latest Posts

संसदेबाहेर पिवळ्या धुराच्या नळकांड्यासह आंदोलन, लातूरच्या तरुणीला दिल्ली पोलिसांकडून अटक

विधान सभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे.

विधान सभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. या पाचव्या दिवशी संसदेत (Parliament Winter Session 2023) प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सुरक्षा भेदल्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. क्षक गॅलरीतून (Audience Gallery) दोघांनी उडी मारून भर लोकसभेत (Lok Sabha) एकच हल्लकल्लोळ माजवला. लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्यामुळे दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एक जण हा महाराष्ट्रातील (Maharashtra News) लातूर जिल्ह्यातला (Latur District) आहे.

लोकसभेबाहेर करण्यात आलेल्या नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एक पुरुष आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यातील महिला नीलम कौर सिंह ही ४२ वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर २५ वर्षीय अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे दोन्ही आरोपी दिल्लीमध्ये संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे आंदोलन करत होते. तसेच त्या दोघांकडे कलर स्मोक होता. त्यामुळे नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे या दोघांना ताब्यात घेतले आहे. अमोल धनराज शिंदे हा संसदेतील आंदोलनात सहभागी होता. ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे हे आंदोलन सुरु होत. आंदोलन सुरु असताना आंदोलकांकडे कलर स्मोक अर्थात पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या सापडल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत, आंदोलकांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांपैकी एक लातूरमध्ये राहणार व्यक्ती आहे. अमोल शिंदे असे तरुणाचे नाव आहे.

संसदेबाहेर दोन व्यक्तींनी गोंधळ घातल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी लगेच त्या दोघांनाही अटक केली आहे. रंगीत धुराच्या नळकांड्या या दोघांनी संसदेबाहेर जाळल्या होत्या. २५ वर्षीय अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे तर ४२ वर्षीय महिला ही हरियाणातील हिस्सार भागातील रहिवाशी आहे.

हे ही वाचा:

KL Rahul ने बुमराहबद्दल सांगितली एक गोष्ट, म्हणाला…

मराठा-ओबीसी समाजात दरी निर्माण करण्याच्या पापाचे वाटेकरी भाजपा सरकार, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss