Saturday, May 18, 2024

Latest Posts

श्रावण महिन्यात Trimbakeshwar मंदिरात दर्शनासाठी जायचं? तर ही बातमी नक्की वाचा…

नुकताच श्रावण महिना हा सुरु झाला आहे. श्रावण महिना सुरु झाल्यामुळे राज्यातील प्रत्येक मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

नुकताच श्रावण महिना हा सुरु झाला आहे. श्रावण महिना सुरु झाल्यामुळे राज्यातील प्रत्येक मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. भाविक मोठ्या प्रमाणावर राज्यातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी करताना दिसून येत आहे. त्यात यावर्षी अधिक श्रावण मास असल्यामुळे अजूनच गर्दी पाहायला मिळत आहे.अशीच गर्दी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात पाहायला मिळत आहे. नाशिकमधील हे मंदिर १२ जोतिलिंगापैकी एक महत्तवाचे ज्योतिलिंग मानले जाते. देश विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात. पण श्रावण महिन्यात होणारी भाविकांची गर्दी लक्षांत घेता मंदिर प्रशासने मोठा निर्णय घेतला आहे. आता भाविकांसाठी मंदिर पहाटे ४ पासून रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. याआधी मंदिर सकाळी ५ पासून रात्री ९ पर्यंत चालू असायचे.

श्रावण महिना हिंदू धर्मातील लोकांसाठी पवित्र महिना मानला जातो. याच महिन्यात अनेक मराठी सण उत्सव साजरा केले जातात. नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळागौर असे पारंपरिक सण साजरे केले जाते. श्रावण मासात अधिक महिना आल्यामुळॆ प्रत्येक मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. त्यात त्रयंबकेश्वर मंदिरात या वर्षी भाविकांची भरपूर गर्दी पहिल्या मिळत आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने दर्शनाची वेळ वाढवली आहे. बदलेल्या वेळेनुसार मंदिर दररोज सकाळी पहाटे ५ ते रात्री ९ वाजे पर्यंत चालू राहणार आहे. श्रावणातील चारही सोमवार मंदिर पहाटे पासून चालू राहणार आहे. तसेच या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. लाखो भाविक मोठ्या संख्येने आणि उत्साहाने येथे दर्शनासाठी जात असतात. भाविकांसाठी मंदिरांचा वतीने आणि पोलीस निरीक्षकांचा सल्याने अनेक बदल करण्यात आले आहेत. दर्शनासाठी वातानुकूलित दरबारी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे हजारो भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहू शकतील. ज्येष्ठांना या रांगेत बसण्यासाठी आणि पिण्याचा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. गर्भवती स्त्रियांसाठी एका वेगळ्या लाइनची व्यवस्था करण्यात आली आहे.मंदिर सोमवारी आणि शनिवारी पालखी येईपर्यंत चालू असणार आहे. दरवर्षी मंदिरावर खास दिव्यांची रोषणाई केली जाते. मंदिरात श्रावण महिन्यात दैनंदिन पूजा आणि अभिषेक सोहळा पार पडतो.

श्रावण महिन्यात नाशिक मधील त्रयंबकेश्वर मध्ये लाखो भाविक २० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ या महिन्यामध्ये दर्शनासाठी आणि प्रदक्षिणेसाठी उपस्थित राहतात. या काळात पोलीस विभागाकडून अनेक सूचना आणि नियम लागू करण्यात आले आहेत. दर्शनासाठी येताना भांविकानी कमीतकमी सामना आणि प्लास्टिक पिशव्या आणू नये. यात्रेत कोणत्या संशयीत किंवा बेवारस वस्तूला हात लावू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत अशी एखादी वस्तू कोणाला सापडली तर ती मंदिराचा आवरतील पोलिसांचा निदर्शनास आणावी. येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने पार्किग चा ठिकाणी लावावीत. यात्रा काळात भाविकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करावे असे आदेश नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिले आहे. श्रावणात लाखो संख्येने त्रयंबकेश्वर मंदिरात भाविक येत असतात. श्रावणचा पहिल्या समोवारी हजारो भाविक उपस्थित राहतात. त्यामुळे रस्ते मार्गावरील खडे बुजवण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. या मार्गावरील खडे मुरूम टाकून बुजवण्यात येणार आहेत. तसेच याच मार्गावर वीज व्यवस्था देखील करण्याचे आदेश इगतपुरीचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

लँडर वेगळे झाल्यानंतर आज संध्याकाळी होणार डिबूस्टिंग, Chandrayaan-3 पोहोचेल चंद्राच्या जवळ…

युवासेना शंभर टक्के जिंकणार होती या भितीपोटी सिनेटची निवडणुक रद्द केली, संजय राऊत

निरोगी शरीरासाठी समजून घेऊयात Vitamin P

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss