आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाभोवतीच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्वच आमदार अडकून पडल्याचे चित्र आपल्याला सध्या दिसत आहे. निवडणुकांच्या आधी जरांगे पाटील यांच्या सारख्या नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचं वाटत आहे परंतु या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं देखील समोर येत आहे. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा खराब केली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार समर्थन अजूनही पक्षकडून झालेले नाही. देवेंद्र फडणवीस हे पक्षात खरच एकटे पडले का? देवेंद्र फडणवीस यांची जी राजकीय चिडचिड चालू झाली आहे त्याला नेमकी काय कारण आहेत?
ULHASNAGAR FIRING: जे झालं ते चुकीचंच…MAHESH GAIKWAD यांच्या पत्नी म्हणाल्या
आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, अर्थसंकल्पीय अधिवेशनात Ajit Pawar यांचे आवाहन