Friday, May 3, 2024

Latest Posts

Eknath Shinde PC Live, सुप्रीम कोर्टाचा निर्णय लोकशाहीला धरून

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल हा निकाल हा लागला आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल हा निकाल हा लागला आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष हे आजच्या निकालाकडे लागले होते. अखेर आज निकाल हा लागला आहे आणि शिंदे सरकार हे बचावल आहे. आणि उद्धव ठाकरे गटाचा कोर्टात हा पराभव झाला आहे. या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदे यांनी काही

यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वात प्रथम शुभेच्छा दिल्या आहेत. अखेर सत्याचा विचाय झाला असे ते म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले लोकशाहीत बहुमताच्या महत्व आहे. या देशात कायदा, नियम आहे आणि त्याच्या बाहेर कोणालाच जात येणार नाही. आपण सरकार हे पूर्णपणे कायदेशीर तरतुदी करून हे सरकार स्थापन केले आहे. अनेक लोक यापूर्वी घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार म्हणायचे. आणि आता सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केले आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लोकशाहीला धरून हे सरकार स्थापन केले आहे. असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहे.

नैतिकता कोणी जपली हे सांगायची गरज नाही असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. धनुष्यबाण वाचवण्याचं काम हे आम्ही केलं आहे. तसेच हा आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल होता. तसेच सर्वोच्च न्यायालाने आज अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. कायद्याच्या आधारेच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह हे आम्हाला दिलं असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना माहिती होतं की त्यांच्यामागे बहुमत नाही, मग राजीनामा दिल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, पण नंतर त्याला नैतिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला. नैतिकता आम्ही जपली, त्यांनी नाही. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाचवण्याचं काम हे आम्ही केलं, त्यांनी ते काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलं होतं. एकनाथ शिंदे म्हणाले की, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतील, कायद्याला धरुनच हा निर्णय घेतला जाईल. आज आमचं सरकार हे सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण बहुमताचं सरकार असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो.

 

Latest Posts

Don't Miss