Monday, May 20, 2024

Latest Posts

राजकारणाची पातळी खालावली आहे; जितेंद्र आव्हाडांनी केला अजित पवारांवर आरोप

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवणुकींची जोरदार तयारी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवणुकींची जोरदार तयारी केली जात आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, आव्हाडांना पडायचं म्हणून म्हणून त्यांना निधी द्याचा नाही. आमच्या फायली अडवल्या जात आहेत. यावरून समजत राजकारणाची पातळी किती खोलवर गेली आहे.अजित पवार हे श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) पाडायचे काम करत आहेत. कल्याणमध्ये येऊन बोलायचे ठाण्यात (Thane) गुंडगिरी वाढली आहे. तुमच्या पुण्यामध्ये शरद मोहोळची हत्या होते. हे सर्व करून तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत का आणत आहात, असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

कळव्यामध्ये एकही मैदान नाही. श्रीकांत शिंदे यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एक खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या या कार्यक्रमाला कोणीही विरोध केला नाही. मात्र आता अजित पवार यांनी असे का केले? असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. जर टाळे लावायचे असेल तर ७२ एकर जमिनीला लावा. ती जमीन खाल्ली जात आहे. तुम्ही नेहमी सांगता मी विकासाचे राजकारण करतो. मग या पोरांचा विकास नको आहे का? इथे एमसीए सिलेक्शन होते. हे सुरू असताना यांनी पैठणकर नावाच्या अधिकाऱ्याला सांगून टाळे लावले. इथे समस्त कळवेकर खेळायला येतात. ज्या मैदानाला लॉक लावायचे त्याला लावा. तुम्ही नशीबवान आहात शरद पवारांनी तुमच्या इथे स्टेडियम बांधले. अजित दादा हे धंदे बंद करा, तुम्ही आणि तुमचा जो कोणी उमेदवार असेल तो यांच्या मनातून उतरला आहे. मी आमदार आहे, मला पाडायचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुम्ही नेते आहात, मुख्यमंत्री म्हणून पुढे जाऊ शकता, असे काम करू नका,असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अश्या छोट्या राजकारणात दादा तुम्ही पडू नका. मला लाज वाटते की मी काही काळ तुमच्या सोबत काम केले आहे. उद्या जर या मैदानाला टाळ लागलं असेल तर आम्ही इथे मुलांसह बसून आंदोलन करू. ही सगळी मध्यमवर्गीय माणसं आहेत. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घेतला. तसेच त्यांच्या मुलाने देखील कार्यक्रम घेतला. जर करायचे होते ते पण बंद करू शकत होते. मी त्यांना कॉल करून विचारलं, ते पण म्हणाले मी असले काही करत नाही, मला काय करायचे आहे. त्यामुळे हे फक्त आणि फक्त अजित दादा यांनीच केले आहे. लहान मुलांचे शाप वाईट असतात, त्यामुळे त्यांच्या वाट्याला तुम्ही जाऊ नका, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

हे ही वाचा:

लोकशाही संपवण्यासाठी ‘ते’ खालच्या पातळीवर गेलेत, Nana Patole यांची आक्रमक भूमिका

मतदारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर येणार नियंत्रण, पण कसे?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss