Tuesday, April 23, 2024

Latest Posts

VANCHIT चर्चा करत नाही म्हणून आम्ही निवडणुका लढायच्या नाहीत का? SANJAY RAUT यांचा सवाल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणालाही मत दिलं तरी ते कमळालाच जाणार असे म्हणत हल्लाबोल केला. व्हीव्हीपॅट संदर्भात सुप्रीम कोर्टाने अजून निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय झाल्यास देशातील लोकशाहीसाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरेल. इलेक्टोरल बॉन्ड नंतर देशात एक वातावरण निर्माण झालं आहे की, भ्रष्टाचारातून निवडणुका कशा जिंकता येतील?, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे कसे गोळा केले जातात? आणि ते निवडणुकीसाठी कसे आणले जातात? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.

ईव्हीएमवरून तुम्ही कोणालाही मत द्या, मत कमळालाच जाणार. यामुळे मतदारांमध्ये भीती आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ही आमची मागणी आहे. मात्र, निवडणूक आयोग, मोदी आणि शाहांची भारतीय जनता पार्टी ऐकायला तयार नाही. त्यामुळे आम्ही व्हीव्हीपॅडचा पर्याय दिला होता. ‘ईव्हीएम हटी, दुर्घटना घटी’ भाजपने हिंमत दाखवायला हवी. संपूर्ण जगातून ईव्हीएम हटवली गेली. मग भाजपला ईव्हीएम वर एवढं प्रेम का? असा आक्रमक सवाल माध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी विचारला. सुप्रीम कोर्ट जर व्हीव्हीपॅट संदर्भात निर्णय घेत आहे, तर संपूर्ण देश या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करेल. सरकारवर टीका करण्याऐवजी हे निर्णय निपक्ष आहेत. हे निर्णय लोकशाही वाचवण्यासाठी आहेत आणि हे निर्णय जनतेच्या आणि राष्ट्राच्या हिताचे आहेत. आत्तापर्यंतच्या दहा वर्षात या सरकारने आणि त्यांच्या नेत्यांनी या देशात लोकशाही राहू नये, या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहू नये, देशातील चार प्रमुख स्तंभ आहेत मीडिया, संसद, न्यायालय, प्रशासक संपवण्यासाठीची पावलं टाकली. असे मत संजय राऊत यांनी व्हीव्हीपॅटच्या विषयावर मांडले.

आम्ही चर्चा बंद केलेली नाही, वंचितच्या नेत्यांनी बंद केली आहे. आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव शेवटी दिलेला आहे. ते म्हणत असतील की, आम्हाला तीनचं जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तर तसं नाही. पाच जागांच्या प्रस्तावात अकोला सुद्धा आहे. रामटेक शिवसेनेची जागा असून धुळेची जागा सुद्धा होती, मुंबईतील एक जागा देण्याच्या विचारात होतो आणि पाचवी जागा सुद्धा त्यांच्यासाठी काढून ठेवली होती. जागेचा प्रस्ताव आमच्याकडून त्यांना गेला, आमच्याकडून चर्चा अजूनही थांबवली गेली नाही. आम्ही आजही चर्चा करायला तयार आहोत. वंचित चर्चा करत नाही म्हणून आम्ही देशात निवडणुका लढायच्या नाहीत का? चर्चा होऊ शकते, अकोल्याच्यापलीकडे देखील चर्चा होऊ शकतात, असे संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याबाबत सांगितले.

हे ही वाचा:

खेळाडू Hardik Pandya ने घेतला ब्रेक? सामन्यात असणार की नाही?

कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss