Sunday, March 3, 2024

Latest Posts

आमिर खानच्या लेकीचं मराठमोळ्या अंदाजात केळवण,लग्नविधींना सुरुवात

आमिर खानच्या लेकीचं मराठमोळ्या अंदाजात केळवण,लग्नविधींना सुरुवात

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या घरी सध्या लग्नाची लगबग सुरु आहे, कारण लवकरच आमिरची लाडकी लेक इरा खान लग्नबंधनात अडकणार आहे. इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे.नवीन वर्षात जानेवारी महिन्यात इरा लग्न करणार आहे. नुपूर शिखरेसोबत तिचा साखरपुडा झाला आहे. इरा आणि नुपूरच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. त्याची झलक तिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत दाखवली आहे.

इरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. तर नुपूर हा सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक आहे. मंगळवारपासून इराच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून त्याला अभिनेत्री मिथिला पालकरनेही हजेरी लावली होती. इरा आणि नुपूरचं लग्न महाराष्ट्रीयन विवाहपद्धतीनुसार पार पडणार असल्याचं कळतंय. त्यानुसार लग्नापूर्वी केळवण आयोजित करण्यात आलं होतं.याआधि देखील ईराचा मराठमोळा लूक आपल्याला नुपुरच्या घरच्या केळवाणाला पाहायला मिळाला होता.दरम्यान यावेळी नुपूर आणि इराच्या कुटुंबीयांसाठी खास जेवण होतं. या केळवणला आमिरची दुसरी पत्नी आणि इराची सावत्र आई किरण रावसुद्धा उपस्थित होती. किरणसोबत तिचा मुलगा आझादसुद्धा केळवणासाठी आला होता. इरा खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणे जेवणाच्या टेबलवर पंगतीत एकत्र बसलेले दिसले, जिथे त्यांना महाराष्ट्रीयन पद्धतीत केळीच्या पानावर जेवण दिले जात होते.

केळवणसाठी इराने लाल रंगाची साडी नेसली होती. तर नुपूरने कुर्ता-पायजमा परिधान केला होता. या दोघांचा साधा लूक नेटकऱ्यांना खूपच आवडला. इराची मैत्रीण आणि ‘लिटिल थिंग्स’ फेम अभिनेत्री मिथिला पालकर देखील या सोहळ्याला उपस्थित होती. इराने तिच्यासोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.

18 नोव्हेंबर रोजी नुपूरने इरासोबत साखरपुडा केला. या साखरपुड्याला जवळचा मित्रपरिवारच उपस्थित होता. दरम्यान आता इरा खान आणि नुपुर हे 3 जानेवारीला लग्न करणार आहेत. इरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे एक प्रसिद्ध फिटनेस तज्ञ आणि सल्लागार आहे. तो आमिर खानचा ट्रेनरही असून तो इरालाही फिटनेस ट्रेनिंग देत असे.यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते.दरम्यान आता सर्वाना इरा – नुपूरच्या लग्नाची उत्सुकता आहे.

हे ही वाचा:

शिर्डीमध्ये आजपासून ‘नो मास्क नो दर्शन’, पालकमंत्र्यांच्या मंदिर प्रशासनाला सूचना

‘माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली’….,लाडकी बहिण गौतमीच्या लग्नानंतर मृणमयीची भावूक पोस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss