“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

प्रभास याचा “आदिपुरुष” हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामधील ‘राम सिया राम’ हे गाणे आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. रिलीज झालेले हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. गाणे रिलीज होताच हे गाणे युट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. हे गाणे प्रेक्षकांनी ऐकल्यावर या गाण्याचे बोल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या गाण्याला एका तासात १.२ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. आता या गाण्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

या गाण्याचे बोल प्रेक्षकांना पसंत तर आले आहेतच त्याचबरोबर या गाण्यामधील संगीत सुद्धा प्रेक्षकांना आवडले आहे. या भक्तिमय गीताचे बोल लोकप्रिय गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला यांनी लिहिले आहेत. तर सचेत टंडन आणि परंपरा टंडनने हे गाणं गायले आहे. या गाण्यामध्ये प्रभू राम आणि सीता यांच्यामधील प्रेम दाखवण्यात आले आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. साऊथ चित्रपटामधील सुपरस्टार प्रभासने हे गाणं शेअर केले आहे आणि त्याच्याखाली कॅप्शन लिहिले आहे की, “आदिपुरुष’चा आत्मा”.

अधिपुरुष या चित्रपट १६ जून रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ७०० कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली आहे तेव्हापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. तरीसुद्धा चित्रपटप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

Aditi Rao Hydari चा Cannes Film Festival मधला लूक पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना राखीव दिवशी रंगणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version