Monday, May 20, 2024

Latest Posts

“काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही”; शरद पवारांचा दावा

काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात." असा दावा शरद पवार (Sharad pawar)यांनी केला आहे. 

“कॉंग्रेस आणि आमच्यात फरक नाही त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात”असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्रपवार पक्षाचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील, तर काही पक्ष कॉंग्रेस(Congress) मध्ये विलीन होतील असं मोठं विधान शरद पवारांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत(Loksabha election) अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यात आता शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक विधाने केली आहे आणि त्यांच्या विधानानंतर राजकीय क्षेत्रात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. “आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील तर काही विलीनीकरण करतील.वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात.” असा दावा शरद पवार (Sharad pawar)यांनी केला आहे. 

पुढे ते म्हणाले की, “माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु पुढील काळातील निर्णय आणि रणनीती ही सामुहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींसोबत(Narendra Modi) जुळवून घेणे ते पचवणे कठीण आहे”

 

“उद्धव ठाकरे (Uddhav thackeray)हे देखील समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे ती आमच्यासारखीच आहे.परिस्थिती १९७७ मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षासारखी होऊ शकते. त्यावेळी जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई(Morarji desai) यांच्यापेक्षा जास्त पाठिंबा राहुल गांधी (Rahul gandhi) यांना आहे.”असंही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही मोठी विधाने शरद पवारांनी केली आहेत.

दरम्यान,कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांनी निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील ६ पैकी २ पक्ष लोप पावतील”असं वक्तव्य केले होते आणि त्यानंतर आता शरद पवारांनी केलेले दावे यावरुन राज्याच्या राजकारणात नवं चित्र पहायला मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. 

Latest Posts

Don't Miss