Sunday, May 19, 2024

Latest Posts

EXCLUSIVE CM Eknath Shinde: मोदीजी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाइम महाराष्ट्र ला विशेष मुलाखत दिली. टाइम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांना मुलाखत देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर चर्चा करत अनेक गौप्यस्फोट केले.

सोमवारी (६ मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी Time Maharashtra ला विशेष मुलाखत दिली. टाइम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांना मुलाखत देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर चर्चा करत अनेक गौप्यस्फोट केले.

एकीकडे पंतप्रधान मोदी तुमच्या कामाचं कौतुक करतात, तुमची पाठ थोपटतात तर दुसरीकडे तुमचे जुने सहकारी आणि आताचे विरोधक तुमच्यावर टीका करत असतात. त्यामुळे तुच्यावर कौतुकाचे दडपण येत आहे की टीकेचे दडपण येत आहे? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, “माझं कौतुक मोदीजींनी केलं त्यामुळे, माझी जबाबदारी आणखी वाढली. मला आणखी जास्त मेहनत करावी लागत आहे. त्यामुळे मोदीजींचे मनापासून धन्यवाद! मोदीजी तर २४/७ काम करत असतात. मी माझ्या जीवनात असा पंतप्रधान बघितला नाही. फक्त देशसेवा हे एकच लक्ष्य आहे. या देशातील गोरगरिबांच्या जीवनामध्ये बदल आणण्याचा निर्णय आणि दुसरीकडे फक्त मोदीद्वेष आणि शिंदेद्वेष! आमच्या कामावर लोक मतदान करतील पण त्यापासून लक्ष्य वळवण्यासाठी रोज आरोप-प्रत्यारोप करत असतात. पण आम्ही त्यांना कामाने उत्तर देणार. आम्हाला जातीवरून शिव्या देणाऱ्या आणि मोदीजींना शिव्या देणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील जनता यांची जागा दाखवतील,” असे ते म्हणाले.

लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत झालेल्या तिढ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मान मिळत नसल्याचे बोलले जात होते. पण अखेरच्या क्षणी ठाणे आणि नाशिकच्या जागा मिळवण्यात त्यांना यश आले. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “महायुती समन्वयाने काम करते. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. आम्हाला जे मतदारसंघ हवे होते ते आम्हाला मिळाले आहेत. थोडंफार मागे पुढे होतं. पण महाविकास आघाडी गळ्यात गळे घालून आणि तंगड्यात तंगड घालून पडतात. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. एकाच मतदारसंघात त्यांचे दोन उमेदवार उभे असतात. तसं आमच्याकडे नाही. आम्ही समन्वय साधून संपूर्ण ४८ मतदारसंघात एकत्र काम करत असतो. मोदीजी महाराष्ट्रात सभा घेतात तरी त्यांची पोटदुखी होते. मोदीजी तुमचा करेक्ट कार्यक्रम करूनच ते थांबणार.” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

EXCLUSIVE CM Eknath Shinde: उंटावरून शेळ्या हाकता येतात का? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Exclusive Eknath Shinde: विरोधकांनी माझ्या कामाचा धसका घेतला कारण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss