Monday, May 20, 2024

Latest Posts

“जागतिक रेडक्रॉस दिन” नेमका काय आहे ? जाणून घ्या इतिहास

आज दिनांक ८मे रोजी जगभरात रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. पण हा रेडक्रॉस दिन नेमका आहे काय? आणि तो का साजरा करतात. त्याचा इतिहास काय आहे हे जाणुन घेऊया.

आज दिनांक ८ मे रोजी जगभरात रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. पण हा रेडक्रॉस दिन नेमका आहे काय? आणि तो का साजरा करतात?  त्याचा इतिहास काय आहे?  हे जाणुन घेऊया.

रेडक्रॉस दिन हा रेड क्रेसेंट चळवळीशी संबंधित असून या चळवळीची तत्वे लक्षात राहावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. रेडक्रॉस दिनाचा मुख्य उद्देश हा नागरिकांचे, जखमी किंवा असहाय्य सैनिकांचे रक्षण करणे आहे. रेडक्रॉस ही एक संस्था असून युद्धादरम्यान जखमी, आकस्मित आणि आपत्कालीन स्थितीमध्ये मदत करते. लोकांना आरोग्याप्रती जागरूक ठेवण्याचे काम ही संस्था करते. रेड क्रॉस दिन हा या संस्थेचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या अभूतपूर्व योगदानासाठी हा दिवस साजरा केला जातो.

 

रेड क्रॉस संस्थेची स्थापना हेन्री ड्युनंट यांनी १८६३ मध्ये केली होती. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंड येथील जिनेव्हा येथे आहे. ड्युनंट यांना त्यांनी केलेल्या मानव सेवेसाठी १९०१ मध्ये पहिला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. रेडक्रॉस या संस्थेने पहिल्या आणि दुसऱ्या विश्व युद्धात जखमी सैनिकांची मदत केली होती. यामुळे १९१७ मध्ये संस्थेला नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित केले होते. रेडक्रॉस संस्था ही जगभरातील लोकांची मदत करते. मागे भारत आणि बांगलादेश मध्ये आलेल्या फानी चक्रीवादळादरम्यान देखील संस्थेने मदत केली होती.

हेन्री ड्युनंट हे एक स्विस उद्योगपती होते. १८५९ मध्ये त्यांनी इटलीची सॉलफेरीनोची लढाई पाहिली. ज्यामध्ये अनेक सैनिक मरण पावले होते. या सैनिकांची काळजी घेण्यासाठी कुठलीही क्लिनिकल सेटिंग नव्हती. त्यावेळी ड्युनंटने एक गट तयार करून जखमी लोकांची काळजी घेतली. त्यांना अन्न व पाणी पुरवले याचबरोबर या गटाने सैनिकांच्या कुटुंबियांना देखील पत्रे लिहून कळवले. या घटनेचा ड्युनंटने अ मेमरी ऑफ सॉलफेरीनोया पुस्तकात त्याचा अनुभव प्रदर्शित केला.

हे ही वाचा:

साबुदाण्याची खिचडी तर सर्वानाच माहिती आहे , पण कधी साबुदाण्याचे पराठे ट्राय केलेत का?

दादा-ताईंच्या भेटीवर अमोल मिटकरींचा सवाल; ‘मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss