Friday, May 17, 2024

Latest Posts

संजय लीला भन्साळी यांच्य आगामी चित्रपटात आलिया,रणबीर आणि विकी झळकणार,नावाची केली घोषणा

बॉलिवूडमधील अभिनेता रणबीर कपुर विकी कौशल आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या त्याच्या आगामी चित्रपटाकरिता चर्चेत आहेत.

बॉलिवूडमधील अभिनेता रणबीर कपुर विकी कौशल आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या त्याच्या आगामी चित्रपटाकरिता चर्चेत आहेत.तर बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट हे प्रेक्षकांच्या चांगलेचं पसंतीस उतरत असतात.भन्साळी यांचे फक्त चित्रपटचं नाही तर त्यांचा भव्य दिव्य सेट हे सगळ चित्रपटात पाहण्याची एक पर्वणीचं असते.

तर नुकतच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची स्टार कास्ट देखील ठरली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेते विकी कौशल, रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाचं आगामी चित्रपटाचं नाव ‘लव्ह अँड वॉर’ असं आहे. नुकतीच आलिया आणि विकीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. आलियानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर ‘संजय लीला भन्साळी यांचा इपिक सागा “लव्ह अँड वॉर” ख्रिसमस 2025 मध्ये येत आहेत. सी यू एट द मुव्हिज’ असं लिहिलेलं दिसत आहे. आलियानं या फोटोला कॅप्शन दिलं, “एक चिरंतन सिनेमाचे स्वप्न साकार झाले आहे.”

रणबीर आणि आलियानं याआधी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम केलं आहे. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या सावरिया या चित्रपटातून रणबीरनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. तसेच आलियानं संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलियानं मुख्य भूमिका साकारली आहे. आता रणबीर आणि आलिया आणि विकी हे ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहेत.

खामोशी, हम दिल दे चुके सनम, देवदास, बाजीराव मस्तानी आणि रामलीला या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.दरम्यान या चित्रपटाच्या नावावरुन तरी हा चित्रपट एका प्रेम कहाणीवर आधारित असल्याचं दिसून येत आहे.यात प्रेम कहाणी आणि युद्ध याचा काही मेळ असणार आहे का? असे अनेक प्रश्न आता चित्रपटच्या नावावरुन प्रेक्षकांना पडणार आहेत.दरम्यान आता या चित्रपटात तीनही कलाकार प्रेक्षकांचे लाडके असल्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत असणार हे नक्की…

हे ही वाचा:

२६ जानेवारीच्या मुख्य शासकीय समारंभाची तालीम संपन्न 

प्रजासत्ताक दिन कसा साजरा कराल,तर या सुट्टीच्या दिवशी ‘या’ ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss