Sunday, May 5, 2024

Latest Posts

राज्यात नवं संकट? अवकाळी पावसाचा घातला धुमाकूळ!

संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसानं धुमाकूळ घालण्यास सुरवात ही केली आहे. मागील काही दिवसांपासून पाहायला मिळालेल्या हवामानाचं चित्र अद्यापही बदलू शकलेलं नाही.

संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसानं धुमाकूळ घालण्यास सुरवात ही केली आहे. मागील काही दिवसांपासून पाहायला मिळालेल्या हवामानाचं चित्र अद्यापही बदलू शकलेलं नाही. राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अवकाळीचं संकट थैमान घालताना दिसत आहे. जिथं, मुसळधार पावसामुळं पुन्हा पिकांचं नुकसान झाल्यामुळं आता बळीराजा हवालदिल झाला आहे.

राज्याच्या अनेक गावामध्ये भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळं भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील भात पिकांसह, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय पिकं, आंबा, बागायती शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.

तर काल संध्याकाळपासूनच लातूर शहर आणि परिसरामध्ये थंड वारे वाहत होते. रात्री साडेनऊनंतर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले. जोरदार वारे आणि विजांच्या गडगडासह लातूरमध्ये तुफान पाऊस झाला. तुफान पडणाऱ्या या पावसामुळं घराकडे निघालेल्या अनेकांची मोठी तारांबळ उडाली. लातूर शहर आणि परिसरात असलेल्या अनेक केशर आंब्याच्या बागाला या पावसामुळं फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील रात्रीपासून जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना अंधारात रहावं लागलं. या पावसामुळे भात पिकांसह पालेभाजी, वेलवर्गीय पिकं, आंबा, बागायती शेती, मका यांना चांगलाच फटका बसला आहे.

भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीच्या वृत्तानुसार २८ एप्रिलपासून देशात पुन्हा एकदा तापमानात काही अंशांची घट नोंदवली जाणार आहे. ज्यामुळं दक्षिणेपासून पश्चिमेपर्यंत आणि पूर्वेपर्यंतही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तर, काही भागांना गारपीटीचा मारा सोसावा लागणार आहे. स्कायमेटच्या (Skymet) अंदाजानुसारही विदर्भ आणि नजीकच्या परिसरावर चक्रीवादळसदृश परिस्थिती तयार होताना दिसत आहे. ज्यामुळं दक्षिणेला कर्नाटक किनारपट्टीच्या अंतर्गत भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसत आहे. परिणामस्वरुप उष्णतेची तीव्रता काही अंशी कमी झाल्याचं जाणवू लागलं आहे.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss