Thursday, May 16, 2024

Latest Posts

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’मधील मस्तीने भरलेले ‘साला कॅरेक्टर’ पहिले गाणे प्रदर्शित

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि  मृद्गंध  फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’ या चित्रपटातील पहिले 'साला कॅरेक्टर' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि  मृद्गंध  फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटातील पहिले ‘साला कॅरेक्टर’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. शाल्मली खोलगडेच्या जबरदस्त आवाजात गायलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले असून अजित परब यांचे अफलातून संगीत लाभले आहे. मस्तीने भरलेल्या या गाण्यात ‘चाळीशी’तील मित्रमैत्रिणींचे गेटटूगेदर दिसत आहे. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अतिशय धमाल आहे.

चाळीशी हा आयुष्यातला असा गंमतशीर टप्पा आहे, जिथे तुम्ही तरुणही नसता आणि प्रौढही. त्यामुळे या वयातील धमाल ही विशेष वेगळी असते. ही धमाल, मजामस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, संदीप देशपांडे निर्माते आहेत.

गाण्याबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” ‘साला कॅरेक्टर’ हे गाणं करताना ते सर्व वयोगटातल्या लोकांना सहज गुणगुणता यावं आणि नाचता यावं असा विचार होता ज्याला अजित परब आणि वैभव जोशी या दोन्ही अवलियांनी पुरेपूर न्याय दिला आहे.गाण्यावरून चित्रपटात काय धमाल येईल, याचा अंदाज तुम्ही बांधूच शकता.”

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट ‘चाळीशी’भोवती फिरणारा आहे. मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये चाळिशीतील मित्रमैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत असून अचानक लाईट जातेय आणि अचानक कसलातरी आवाज ऐकू येतोय. लिपस्टिकचे निशाण, संशयास्पद आवाज, त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहाता हे काहीतरी धमाल मनोरंजन असणार हे नक्की! सध्यातरी चाळीशीतील या चोरांबद्दलचे हे गूढ अधिकच वाढत आहे.हा चित्रपट २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरेंना मोठा धक्का, निवडणुकीच्या तोंडावर नेते वसंत मोरेंनी दिला मनसेला राजीनामा

तेजस्विनी पंडितने केली ‘येक नंबर’ या चित्रपटाची घोषणा,सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss