Thursday, May 16, 2024

Latest Posts

तेजस्विनी पंडितने केली ‘येक नंबर’ या चित्रपटाची घोषणा,सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

राजकीय विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात राजकीय अशी 'येक नंबर' प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

 वर्धा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एंटरप्राईज आणि तेजस्विनी पंडित यांच्या सह्याद्री फिल्म्स निर्मित, नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेनमेंट प्रस्तुत एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या शुभदिनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून ‘येक नंबर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘व्हेंटिलेटर’, ‘फेरारी की सवारी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीचे चित्र नव्याने उलगडणार, हे नक्की!

राजकीय विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात राजकीय अशी ‘येक नंबर’ प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा असेल. तसेच संगीत क्षेत्रातील आपल्या आजरामर संगीताची जादुची भुरळ घालणाऱ्या अजय-अतुल या प्रशंसनीय जोडीचे संगीत या सिनेमाला लाभले आहे. महाराष्ट्रातील वाई, जुन्नर, मुंबई आणि कोकण यांसारख्या नयनरम्य ठिकाणी ‘येक नंबर’चे ५२ दिवस चित्रीकरण होणार आहे.

तेजस्विनी पंडित ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते,ती तिचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना देत असते.तसेच तेजस्विनीने आपल्या या आगामी सिनेमाबाबत सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तेजस्विनीने पोस्टमध्ये लिहिले की, मित्र-मैत्रिणींनो
आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण, सहकारी निर्माती वर्धा नाडियाडवालाच्या साथीने आजपासून“येक नंबर” कारभार जमवलाय,निर्माती म्हणून आणखी एक मोठी उडी घेतलीये, नेहमीप्रमाणे तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असू दे !ह्या आमच्या प्रवासात आम्हाला भक्कम तंत्रज्ञ लाभले आहेत.दिग्दर्शक राजेश मापुस्कर, छायाचित्रकार संजय मेमाने आणि संगीत अजय-अतुल. आमच्या ह्या “येक नंबर” परिवाराला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे !आजपासून “येक नंबर“ च्या चित्रीकरणास सुरुवात,गणपती बाप्पा मोरया अशी खास पोस्ट शेअर केली आहे.तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हे ही वाचा:

‘महादेव’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित,अंकुश चौधरी दिसणार नव्या भूमिकेत

बारामती डॅमेज केलं तर आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू;अजित पवार गटाकडून एकनाथ शिंदेंना इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss