Thursday, May 2, 2024

Latest Posts

राज ठाकरेंना मोठा धक्का, निवडणुकीच्या तोंडावर नेते वसंत मोरेंनी दिला मनसेला राजीनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पुण्यातील मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पुण्यातील मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. काल रात्री त्यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. वसंत मोरे यांनी आज पत्र लिहीत मनसे पक्षाला राजीनामा दिला आहे. प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resignation) त्यांनी राजीनामा देत सोशल मीडियावरून पत्र शेअर केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्ष सोडल्याने राज ठाकरेंना हा मोठा धक्का आहे. मागील अनेक दिवसांपासून वसंत मोरे पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, अशी पोस्ट शेअर केली होती. मात्र त्यांनी काही तासातच मनसेला राजीनामा दिला. त्यामुळे आता वसंत मोरे नेमके कोणत्या पक्षात जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

वसंत मोरे यांनी पत्रात नेमकं काय लिहिलं आहे?

प्रति,

मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणास सप्रेम जय महाराष्ट्र।

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्याना ताकद देतो त्या सहकान्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कोडी करण्याचे ‘तर अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम विनंती.

धन्यवाद ।

आपूज्य विश्वास

हे ही वाचा:

‘महादेव’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित,अंकुश चौधरी दिसणार नव्या भूमिकेत

नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र बोगस, संजय राऊत खोटं बोलतात, वेळकाढूपणामुळे जागावाटप रखडलं; प्रकाश आंबेडकर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss