Wednesday, May 15, 2024

Latest Posts

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

मराठी सिनेसृष्टीतील हुरहुन्नरी कलाकार अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी कलाविश्वाला त्यांच्या अभिनयाच्या जोरावर भरभरुन योगदान दिले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील हुरहुन्नरी कलाकार अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी कलाविश्वाला त्यांच्या अभिनयाच्या जोरावर भरभरुन योगदान दिले आहे.दरम्यान आता त्यांनी ,सिनेसृष्टिला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे.९०च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा हा एक लोकप्रिय चेहरा आहे.तेव्हाच्या प्रेक्षक वर्गापासून ते आताच्या पिढीतील प्रेक्षक वर्गापर्यंत अशोक सराफ हे आवडते कलाकार आहेत.त्यांनी नेहमीच आपल्या अभिनयाचे नवनवीन पैलू प्रेक्षकांसमोर मांडले,दरम्यान अशोक सराफ यांचा चित्रपट पाहायला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडतं अशोक सराफ यांना अभिनयाची आवज होती. ते सुरुवातीच्या काळात रंगभूमीवर सक्रीय होते. अशातच रंगभूमीवर काम करताना अशोक मामांना स्टेट बँकेच्या नोकरीची ऑफर आली.

पुढे बँकेत नोकरी करतानाही अशोक मामांनी नाटकं आणि रंगभूमीची साथ सोडली नाही. आंतरबँक एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी पहिलं पारितोषिक पटकावलं. पुढे अशोकमामा नोकरी सांभाळत सांभाळत नाटकं करु लागले.पुढे एका नाटकासाठी प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळत असताना गजानन जहागीरदार यांनी ‘दोन्ही घरचा पाहुणा’ सिनेमासाठी अशोकमामांची निवड केली.अशाप्रकारे अशोक सराफ यांना आयुष्यातला पहिला सिनेमा मिळाला. त्यावेळी सात दिवसांच्या कामासाठी मामांना ५०० रुपये मिळाले होते.

अशोक मामांनी महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले “मला कल्पना नव्हती मला हा पुरस्कार मिळेल. मी कुठेतरी चांगलं काम करतोय. माझी आतापर्यंतची धडपड सार्थकी लागली. मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं. हे यश माझं नाही तर माझ्या सहकाऱ्यांचंही आहे. या यशात निवेदिता माझ्यासोबत होती.”

अशोक सराफ यांना त्यांचे सहकलाकार, तसंच चाहतेही प्रेमाणं मामा असं म्हणतात. त्याचाही एक खास किस्सा आहे, एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कॅमेरामन त्याच्या मुलीला सेटवर घेऊन आले होते. त्यानं दुरूनच बोट करत आपल्या मुलीला सांगितलं, ‘ते बघ तुझे अशोक मामा.’ त्यानंतर त्या मुलीसोबतच सेटवरील सगळेच अशोक यांना मामा म्हणून हाक मारू लागले आणि तेव्हापासून ते सगळ्या चाहत्यांचे आणि कलाविश्वातील कलाकारांचे देखील मामा झाले.आता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी अशोक यांना आपुलकीनं मामा म्हणू लागली.तर अशा या हुरहुन्नरी कलाकाराला मिळालेला सन्मान हा बहुमोल्य आहे,

हे ही वाचा:

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

FASTag KYC अपडेट करण्याची आज आहे शेवटची तारीख, जाणून घ्या कसे करायचे अपडेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss