Friday, May 17, 2024

Latest Posts

Deepika Padukone च्या घरी होणार चिमुकल्या पाऊलांचे आगमन?

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्रीमध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिला पहिले जाते.

Deepika Padukone and Ranveer Singh : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्रीमध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिला पहिले जाते. त्याच बरोबर दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडचं लोकप्रिय ‘पॉवर कपल’ आहे. ही जोडी नेहमीच चर्चेत असते. अश्यातच आता ते दोघे आता पुन्हा एकदा नवीन मुद्यावरून चर्चेत आले आहेत.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह या दोघांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. दीपिका आणि रणवीरची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अशातच आता अभिनेत्री आई होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघेही २०१८ साली लग्नबंधनात अडकले.अशातच आता दीपिका कधी गुडन्यूज देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या संदर्भात दीपिकाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

वोग सिंगापुरला दिलेल्या मुलाखतीत दीपिका पादुकोण म्हणाली,”रणवीर आणि मला लहान मुले खूप आवडतात. आमच्या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री कधी होणार याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. कुटुंबातील मंडळी मला भेटल्यानंतर माझ्यात काहीही बदल झाला नाही”, असं आवर्जुन सांगतात. दीपिका पुढे म्हणाली,”इंडस्ट्रीत पैसे आणि फेम मिळवलं असलं तरी आजही माझे पाय जमिनीवरच आहेत. घरी मी सेलिब्रिटी नसते. माझे पाय जमिनीवर ठेवण्यात माझा कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. रणवीर आणि मी आमच्या मुलांवरदेखील असेच संस्कार करू”.

 

दीपिका पादुकोण २०२३ मध्ये दोन बड्या ब्लॉकबस्टर सिनेमांचा भाग होती. ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दीपिका दिसून आली. तसेच किंग खानच्या ‘जवान’ (Jawan) या सिनेमातदेखील तिची स्पेशल झलक दिसून आली आहे. दीपिकाचा ‘फायटर’ (Fighter) हा सिनेमा २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिका हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हे ही वाचा:

हवाई प्रवास होणार स्वस्त, इंडिगोने घेतला मोठा निर्णय

पश्चातापाशिवाय खेद व्यक्त करणं म्हणजे मगरीने अश्रू ढाळण्यासारखं आहे – Chitra Wagh

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss