Tuesday, April 23, 2024

Latest Posts

Ranbir Kapoor कडून मेहुण्याला मिळाले ‘इतके’ कोटी रुपये

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले. आलिशान लग्नाऐवजी घरातच लग्नगाठ बांधली. त्याचवेळी रणबीरने आलियाच्या बहिणींना आणि मेहुण्यांना बूट पळवण्यासाठी ११-१२ कोटी रुपये दिल्याचे सांगितलं आहे. कपिल शर्माचा शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ३० मार्च पासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर चालू झाला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा साहनीसोबत आला होता. तिघांनी त्यांच्या घरातले मजेशीर किस्से सांगितले. गुत्थीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोवर पासून कपिलच्या टीमधील इतर कलाकारपर्यंत सर्वांचे मनोरंजन केले.

लग्नाचा विषय येताच कपिल शर्माने रणबीरला विचारले की, लग्नात बुट पळवल्यानंतर मेहुणींना ११-१२ कोटी रुपये दिले होते का? यावर रणबीरने मजेशीर उत्तर दिले. आलियाच्या बहिणींनी कधीच माझ्याकडे करोडो रुपये मागितले नाही. बुट पळवण्याचे काही लाख रुपये माझ्याकडे मागितले पण, त्यावेळी मी त्यांच्यासोबत थोडी बार्गनिंग केली. मी त्यांना काही “हजार रुपये” देईन असे रणबीर कपूर ने मेहुण्यांना सांगितले. आमचं लग्न घरीच झाला. त्यामुळे त्यांनी बूट जरी दिली नसती, तरी मी घरीच राहणार होतो, असे त्याने सांगितलं आहे. त्याच दरम्यान, कपिलने पण त्याच्या लग्नात झालेला प्रसंग सांगितलं होते. यावेळी कपिलने सांगितलं की, त्याच्या मेहुण्यांनी बूट पळवल्यानंतर त्याच्याकडून ११ लाख रुपये मागत होते. त्यावेळी त्यांनी मेहुणींना सांगितलं की, तुमची बहिण आणि ते बुट दोन्ही तुमच्याकडे ठेवा. या उत्तरावर सगळेजण हसू लागले.

हे ही वाचा:

खेळाडू Hardik Pandya ने घेतला ब्रेक? सामन्यात असणार की नाही?

महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा प्रतिनिधी म्हणून…काय म्हणाले ROHIT PAWAR?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss